Rajat Patidar Became A 5th Batsmen Who Score Century in Play Off knockouts In IPL
Rajat Patidar Became A 5th Batsmen Who Score Century in Play Off knockouts In IPL  esakal
IPL

Rajat Patidar | 'शतकवीर' रजत, सेहवाग - वॉटसनच्या यादीत दाखल

अनिरुद्ध संकपाळ

कोलकाता : आयपीएलच्या एलिमनेटर सामन्यात पावसामुळे नाणेफेकीस उशीर झाला. नाणेफेक जिंकून लखनौ सुपर जायंटने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र आरसीबीच्या रजत पाटीदारने (Rajat Patidar) चौफेर फटकेबाजी करत लखनौच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले. त्याने शतकी (Century) खेळी करत आरसीबीला 200 च्या घरात पोहचवले.

आरसीबीचे फाफ ड्युप्लेसिस, विराट कोहली (Virat Kohli), ग्लने मॅक्सवेल हे रथी महारथी स्वस्तात माघारी गेल्यानंतर रजत पाटीदारने एकट्याने आरसीबीच्या फलंदाजीचे शिवधनुष्य पेलले. विशेष म्हणजे रजत पाटीदार या शताकमुळे विरेंद्र सेहवाग आणि शेन वॉट्सन यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूंच्या पंक्तीत जाऊन बसला. रजत पाटीदार प्ले ऑफमध्ये शतक करणारा पाचवा फलंदाज ठरला.

यापूर्वी प्ले ऑफमध्ये विरेंद्र सेहवागने चेन्नई सुपर किंग्जविरूद्ध 2014 ला क्वालिफायर 2 सामन्यात 122 धावा केल्या होत्या. तर शेन वॉट्सनने 2018 मध्ये हैदराबाद विरूद्ध फायनल सामन्यात 117 धावांची खेळी केली होती. याचबरोबर वृद्धीमान साहाने 2014 मध्ये केकेआर विरूद्ध फायनलमध्ये 115 धावांची खेळी केली. मुरली विजयने देखील 2012 ला दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध 113 धावांची खेळी केली. आयपीएलच्या 15 व्या हंगामात रजत पाटीदारने लखनौ सुपरजायंट विरूद्ध नाबाद 112 धावा केल्या. तो प्ले ऑफमध्ये शतक ठोकणारा पाचवा फलंदाज ठरला. विशेष म्हणजे त्याने यंदाच्या हंगामातील सर्वात जलद शतक ठोकले. त्याने 49 चेंडूत शतक झळकावले.

रजत पाटीदारबरोबरच दिनेश कार्तिकने देखील 23 चेंडूत 37 धावा चोपून आरसीबीला 207 धावांपर्यंत पोहचवले. रजत पाटीदारने 54 चेंडूत 112 धावा केल्या. याचबरोबर विराट कोहलीने 25 तर महिपाल लोमरोरने 14 धावांचे योगदान दिले. रजत पाटीदारने विराट कोहली बरोबर 66 तर दिनेश कार्तिक बरोबर पाचव्या विकेटसाठी 41 चेंडूत नाबाद 92 धावांची भागीदारी रचली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'7 दिवस पत्नी अन् 7 दिवस प्रेयसीसोबत राहतो'; कराराच्या आधारे कोर्टाने केली आरोपीची सुटका

Sanju Samson Fined : अंपायरशी वाद घालणे आले अंगलट... BCCI ची संजू सॅमसनवर मोठी कारवाई; काय आहे संपूर्ण प्रकरण

Kolhapur Lok Sabha : मुश्रीफांच्या सांगण्यावरून कारवाई करत असाल तर मीही छत्रपतीये, याद राखा; संभाजीराजेंचा कोणाला इशारा?

Latest Marathi News Live Update : अमित शहा यांची आज जालन्यात सभा

Share Market Opening: गुंतवणूकदार चिंतेत! शेअर बाजारात पुन्हा घसरण; 'या' शेअर्सचे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT