Rajat Patidar Josh Hazlewood Shine Royal Challengers Bangalore Defeat Lucknow Super Giants
Rajat Patidar Josh Hazlewood Shine Royal Challengers Bangalore Defeat Lucknow Super Giants  ESAKAL
IPL

RCB vs LSG : राहुल झुंजला मात्र आरसीबीने लखनौचा गाशा गुंडाळला

अनिरुद्ध संकपाळ

कोलकाता : शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात अखेर रॉयल चॅलेंजर बेंगलोरने लखनौ सुपर जायंटचा 14 धावांनी पराभव करत आयपीएलमधून त्यांचा गाशा गुंडाळला. केएल राहुलने झुंजार 79 तर दीपक हुड्डाने 45 धावा केल्या मात्र मोक्याच्या क्षणी आरसीबीच्या गोलंदाजांना आपला खेळ उंचावत सामन्यावर नियंत्रण मिळवले.

आरसीबीकडून जॉस हेजलवूडने 3 विकेट घेतल्या. फलंदाजीत आरसीबीकडून रजत पाटीदारने नाबाद 112 धावांची शतकी खेळी केली. तर त्याला कार्तिकने 23 चेंडूत नाबाद 37 धावा करून चांगली साथ दिली. (Rajat Patidar Josh Hazlewood Shine Royal Challengers Bangalore Defeat Lucknow Super Giants In IPL 2022 Eliminator)

रॉयल चॅलेंजर बेंगलोरने ठेवलेल्या 208 धावांचा पाठलाग करताना पहिल्याच षटकात मोहम्मद सिराजने क्विंटन डिकॉकला 6 धावांवर बाद केले. त्यानंतर मात्र केएल राहुल आणि मनन व्होराने भागीदारी रचण्यास सुरूवात केली. मात्र जॉस हेजलवूडने मननला 19 धावांवर बाद केले.

यानंतर केएल राहुलने दीपक हुड्डाच्या साथीने डाव सावरला. दरम्यान, केएल राहुलने अर्धशतक ठोकले. तर दीपक हुड्डाने देखील आपला गिअर बदलत फटकेबाजी करण्यास सुरूवात केली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 96 धावांची भागीदारी रचली. मात्र दीपक हुड्डाचा हसरंगाने 45 धावांवर त्रिफळा उडवला.

यानंतर केएल राहुल आणि मार्कस स्टॉयनिसने सामना जवळ आणला. सामना 18 चेंडूत 45 धावा असा आणला. 18 वे षटक टाकणाऱ्या हर्षल पटेलने पहिल्या दोन चेंडूवर वाईट बॉल टाकत सहा धावा दिल्या. त्यामुळे सामना 18 चेंडूत 39 धावा असा आला. मात्र याच षटकात त्याने स्टॉयनिसला 9 धावांवर बाद केले. हर्षलने 18 व्या षटकात 8 धावा देत सामना 12 चेंडूत 33 धावा असा आणला.

दरम्यान, 19 वे षटक टाकणाऱ्या जॉस हेजलवूडनेही षटकाच्या सुरूवातीलाच तीन वाईड टाकले. मात्र त्याने 57 चेंडूत 79 धावा करणाऱ्या केएल राहुलला बाद करत लखनौला मोठा धक्का दिला. पुढच्याच चेंडूवर हेजलवूडने क्रुणाल पांड्याला शुन्यावर बाद केले. हेजवलूडने 9 धावा देत 2 विकेट घेतल्या. त्यामुळे लखनौला विजयासाठी 6 चेंडूत 24 धावा हव्या होत्या. शेवटचे षटक हर्षल पटेल टाकत होता. त्याने 3 चेंडूत 8 धावा दिल्या. तिसऱ्या चेंडूवर चमीराने षटकार मारला. त्यामुळे सामना 3 चेंडूत 16 धावा असा आणला. मात्र पटेलने चौथ्या चेंडूवर एकच धाव देत सामना आरसीबीच्या खिशात टाकला. पुढच्या दोन चेंडूवर त्याने एकही धाव दिली नाही. आरसीबीने सामना 14 धावांनी जिंकला.

आयपीएलच्या एलिमनेटर सामन्यात पावसामुळे नाणेफेकीस उशीर झाला. नाणेफेक जिंकून लखनौ सुपर जायंटने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मोहसीन खानने आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसिसला शुन्यावर बाद केले. त्यानंतर विराट कोहली आणि रजत पाटीदारने भागीदारी रचण्यास सुरूवात केली. त्यांनी दुसऱ्या विकेटसाठी 66 धावांची भागीदारी रचली. मात्र विराटने 25 धावा करत रजतची साथ सोडली.

त्यानंतर डावाची सूत्रे आपल्या हातात घेत रजत पाटीदारने (Rajat Patidar) चौफेर फटकेबाजी करत लखनौच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले. दरम्यान, मॅक्सवेल (9) तर महिलाप लोमरोर (14) धावांची भर घालून परतले. दरम्यान रजतने शतकी (Century) खेळी करत आरसीबीला 200 च्या घरात पोहचवले. त्याचे हे हंगामातील पहिलेच शतक होते. तसेच त्याने 49 चेंडूत शतक ठोकत हंगामातील सर्वात वेगवान शतक पूर्ण केले.

रजत पाटीदारबरोबरच दिनेश कार्तिकने देखील 23 चेंडूत 37 धावा चोपून आरसीबीला 207 धावांपर्यंत पोहचवले. रजत पाटीदारने 54 चेंडूत 112 धावा केल्या. याचबरोबर विराट कोहलीने 25 तर महिपाल लोमरोरने 14 धावांचे योगदान दिले. रजत पाटीदारने विराट कोहली बरोबर 66 तर दिनेश कार्तिक बरोबर पाचव्या विकेटसाठी 41 चेंडूत नाबाद 92 धावांची भागीदारी रचली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : दोन धक्क्यानंतर यशस्वी, रियाननं डाव सावरला; राजस्थान 10 षटकात शतक पार

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT