ravichandran ashwin  
IPL

IPL 2022: चेन्नईविरुद्ध मला माझा 'A' गेम खेळायचा होता - अश्विन

राजस्थानच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान अष्टपैलू रविचंद्रन अश्विनने दिले

सकाळ ऑनलाईन टीम

आयपीएलच्या प्लेऑफमध्ये आता राजस्थान रॉयल्सने प्रवेश केला आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील संघाने शुक्रवारी ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात 4 वेळची चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्जचा 5 विकेटने पराभव केला. राजस्थानच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान अष्टपैलू रविचंद्रन अश्विनने दिले. अश्विनने 23 चेंडूत 40 धावांची नाबाद खेळी खेळली आणि 1 विकेट पण घेतला. अश्विनने सामन्यानंतर आपल्या कामगिरीवर आनंद व्यक्त करताना म्हणाला, मला माझा 'A' गेम खेळायचा होता.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने मोईन अलीच्या शानदार 93 धावांच्या खेळीमुळे 6 बाद 150 धावा केल्या. प्रत्युत्तर राजस्थानने 19.4 षटकांत 5 गडी गमावून लक्ष्य गाठले. क्वालिफायर-१ मध्ये आता राजस्थानचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. आयपीएल 15 व्या हंगामाचा शेवटचा सामना चेन्नईने पराभवाने संपला.

अश्विनने राजस्थानच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली त्यामुळे त्याला सामनावीर ठरवण्यात आले. अश्विनने 23 चेंडूत नाबाद 40 धावा केल्या, त्यात 2 चौकार आणि 3 षटकार देखील मारले. राजस्थानसाठी सलामीवीर यशस्वी जैस्वालने सर्वाधिक 44 चेंडूंच्या 59 धावा केल्या. या खेळीत 8 चौकार आणि 1 षटकार मारला.

विजयानंतर अश्विन म्हणाला, हा विजय आमच्यासाठी खूप महत्त्वाचा होता. ग्रुप स्टेजचा शेवट खूप चांगला आहे. स्पर्धेपूर्वी सर्व काही स्पष्ट होते. मला अनेक गोष्टींवर काम करावे लागणार होते. संघ व्यवस्थापन माझ्या भूमिकेबाबत मला स्पष्ट सांगितले होते. त्यामुळे मला आज माझा 'A' गेम खेळायचा होता. आणि या विजयानंतर संघ प्लेऑफमध्ये पोचला खूप आनंद होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाणी वाचवा! एक लीटर पाण्यात अंघोळ, RSSच्या स्वयंसेवकांना प्रशिक्षण देत असल्याचा VIDEO VIRAL

IPL 2026 Final, RCB vs GT live: अहमदाबादमध्ये रंगणार महामुकाबला! दुसऱ्या ट्रॉफीसाठी बंगळुरू-गुजरात आमने-सामने; कुठे अन् कधी पाहाणार मॅच?

Solapur Vidhansabha BJP: सोलापूर विधान परिषदेसाठी भाजपचा सस्पेन्स कायम; उमेदवारीवरून भाजपमध्ये चुरस, कोणाला मिळणार संधी?

Pune Medical College: दोन तासांचे काम; महिन्याचा दाम, पुण्यातील अटलबिहारी वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्‍टरांचा अनोखा फंडा

"आमिर आणि माझ्या नात्याला नाव मिळालं नाही" पूजा भट्टचा धक्कादायक खुलासा; नात्याबद्दल म्हणाली..

SCROLL FOR NEXT