Ravichandran Ashwin IPL 2023 esakal
IPL

Ravichandran Ashwin IPL 2023 : बोलायचं नाही! अंपायरिंगवर वक्तव्य करणं अश्विनला भोवलं, बीसीसीआयने केली कारवाई

अनिरुद्ध संकपाळ

Ravichandran Ashwin IPL 2023 : राजस्थानचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनला आयपीएलच्या 17 व्या सामन्यात अंपायरिंगवरून वक्तव्य केले होते. या वक्तव्यानंतर वादंग निर्माण झाले. आता या वक्तव्यामुळेच रविचंद्रन अश्विनवर बीसीसीआयने कारवाई केली आहे. बीसीसीआयने आयपीएलच्या आचारसंहितेचा भंग केल्याने अश्विनवर ही कारवाई केली.

रविचंद्रन अश्विनने चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यावेळी अंपायरिंगवरून वक्तव्य केले होते. त्यावर बीसीसीआयने कारवाई करत त्याच्या सामन्याच्या मानधनातून 25 टक्के रक्कम दंड म्हणून कापून घेतली आहे. विशेष म्हणजे बीसीसीआयने अश्विनवर कोणत्या गुन्ह्यासाठी कारवाई केली याची अधिक माहिती दिलेली नाही. मात्र बीसीसआयमधील सूत्रांनी अश्विनला अंपायरिंगवर वक्तव्य करणे भोवल्याचे सांगितले.

अश्विनने चेन्नई सुपर किंग्जविरूद्धच्या सामन्यात अंपायर्सनी स्वतःच चेंडू बदलल्याने आश्चर्य वक्त केले होते. चिदंबरमन स्टेडियमवर खूप दव पडले होते. त्यामुळे चेंडू ओला झाला होता. मात्र अंपायर्सनी कोणालाही न विचारचा चेंडू बदलला. यावेळी अश्विन गोलंदाजी करत होता.

(Sports Latest News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुम्ही जे खाताय ते खरंच सुरक्षित आहे का?, खरेदी करण्याआधी हे तपासा... तुकाराम मुंढेंनी सांगितली महत्त्वाची गोष्ट

Nepal Flood Alert : नेपाळच्या महापुरात नाशिकचे पर्यटक अडकले? जिल्हा प्रशासनाकडून तातडीने हेल्पलाइन क्रमांक जारी, पाहा लिंक आणि कंट्रोल रूम नंबर

‘I Love My बायको! रितेश असं बोलला तरी जेनिलिया रुसली, दोघांचा व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले...

Marathi News Live Updates : बेरोजगारांच्या हक्कांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची पुण्यात भव्य रॅली

MPSC Paper Leak : पेपरफुटीला लव्ह स्टोरी नाही, सत्ताधारी जबाबदार; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT