Ravindra Jadeja Hold Record of Most Wicket Against Royal Challengers Bangalore  esakal
IPL

CSK vs RCB : रविंद्र जडेजा ठरतोय RCB साठी 'कर्दनकाळ'

सकाळ डिजिटल टीम

नवी मुंबई : चेन्नई सुपर किंग्जने (Chennai Super Kings) आयपीएलच्या 15 व्या हंगामात चार पराभवानंतर अखेर पहिल्या विजयाची चव चाखली. त्यांनी रॉयल चॅलेंजर बेंगलोरचा (Royal Challengers Bangalore) 23 धावांनी पराभव केला. सीएसकेने पहिल्यांदा बॅटिंग करताना 216 धावांचा डोंगर उभारला होता. त्यात शिवम दुबेने 95 धावांची तर रॉबिन उथप्पाने 88 धावांची खेळी केली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 165 धावांची भागीदारी रचली. त्यानंतर गोलंदाजीत सीएसकेच्या फिरकीपटूंनी आरसीबीच्या फलंदाजांना यशस्वीरित्या रोखले. महीश तीक्षाणाने 4 तर रविंद्र जडेजाने (Ravindra Jadeja) 3 विकेट घेतल्या. विशेष म्हणजे रविंद्र जडेजाने आरसीबी विरूद्ध एक खास विक्रम देखील केला. (Ravindra Jadeja Hold Record of Most Wicket Against Royal Challengers)

रविंद्र जडेजाने आरसीबीविरूद्ध डी. वाय. पाटील स्टेडियमवर 3 विकेट घेतल्या. त्यामुळे त्याची आरसीबीच्या एकूण विकेट घेण्याची बेरीज 26 विकेट्स पर्यंत पोहचली. त्याने आरसीबीविरूद्ध सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम अबाधित ठेवला. त्यामुळे आरसीबीसाठी रविंद्र जडेजा हा कर्दनकाळ ठरतोय.

रविंद्र जडेजा बरोबरच सीएसकेकडून खेळणाऱ्या श्रीलंकन फिरकीपटू महीश तीक्षाणाने (Maheesh Theekshana) देखील आरसीबीच्या फलंदाजांना सतावले. त्याने आपल्या चार षटकांच्या कोट्यात 4 विकेट काढून देत आरसीबीच्या धावगतीला ब्रेक लावला. चेन्नईने या सामन्यात आपला पहिला विजय मिळवला. तर आरसीबीचा यंदाच्या हंगामातील हा दुसराच पराभव होता. विजयानंतर रविंद्र जडेजाने कर्णधार म्हणून आपला पहिला विजय हा आपल्या पत्नीला समर्पित केला. याचबरोबर त्याने मी कर्णधार म्हणून अजून शिकतोय असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण! 'शिवरायांच्या किल्ल्यासाठी PM मोदींनी केले विशेष प्रयत्न'; UNESCO च्या मानांकनानंतर काय म्हणाले फडणवीस?

Record Breaking : १० चौकार, १२ षटकार! ३५३ च्या स्ट्राईक रेटने शतक; ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये भीमपराक्रम, २९ धावांत ९ गेल्या तरी संघ जिंकला

Latest Marathi News Updates : जयंत पाटील हे घाबरणारे नेते नाहीत - रोहित पवार

SCROLL FOR NEXT