IPL 2024 Rishabh Pant News Marathi sakal
IPL

IPL 2024 : 4,6,6,4,4,4... कर्णधार रोहित वर्ल्ड कपच्या टेन्शनमधून झाला फ्री... मात्र KL राहुल उडाली झोप, Video

IPL 2024 Rishabh Pant News : इंडियन प्रीमियर लीग 2024 भारतीय क्रिकेट संघासाठी मोठी बातमी घेऊन आली आहे. या वर्षी जूनमध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपपूर्वी भारताची सर्वोत्तम यष्टिरक्षकाची प्रतीक्षा संपलेली दिसत आहे.

Kiran Mahanavar

IPL 2024 Rishabh Pant News : इंडियन प्रीमियर लीग 2024 भारतीय क्रिकेट संघासाठी मोठी बातमी घेऊन आली आहे. या वर्षी जूनमध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपपूर्वी भारताची सर्वोत्तम यष्टिरक्षकाची प्रतीक्षा संपलेली दिसत आहे.

ऋषभ पंत नावाचे वादळ ज्या प्रकारे आयपीएलमध्ये परतले आहे, त्यावरून त्याचे टीम इंडियात पुनरागमन निश्चित असल्याचे दिसत आहे. पंतने बुधवारी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध एका षटकात 28 धावा ठोकल्या. त्यामुळे भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा वर्ल्ड कपच्या टेन्शनमधून नक्कीच फ्री झाला. मात्र भारताच्या इतर यष्टीरक्षक फलंदाजांची झोप उडाली असेल.

बुधवारी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध दिल्ली कॅपिटल्सला 106 धावांनी दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. या लाजिरवाण्या पराभवातही दिल्लीला थोडा दिलासा मिळाला असेल. कारण म्हणजे कर्णधार ऋषभ पंत. त्याने कोलकाताविरुद्ध 25 चेंडूत 55 धावा केल्या. दरम्यान पंतने या खेळीत 5 षटकार आणि 4 चौकार लगावले.

डावाच्या 12व्या षटकात ऋषभ पंतची किलर स्टाईल समोर आली. या यष्टीरक्षक फलंदाजाने व्यंकटेशच्या या षटकाची सुरुवात चौकाराने केली. यानंतर त्याने सलग 2 षटकार ठोकले. मग शेवटी पंतने चौकारांची हॅट्ट्रिक मारली. अशाप्रकारे ऋषभ पंतने व्यंकटेश अय्यरच्या एकाच षटकात 28 धावा ठोकल्या.

दिल्ली कॅपिटल्सचे मिचेल मार्श, अभिषेक पोरेल आणि अक्षर पटेल यांना केकेआरविरुद्ध खातेही उघडता आले नाही. रसिक सलाम आणि इशांत शर्माने प्रत्येकी एक तर एनरिक नॉर्सियाने 4 धावा केल्या. पृथ्वी शॉच्या बॅटमधून 10 तर सुमित कुमारच्या बॅटमधून 7 धावा आल्या. अशा प्रकारे पंतने संपूर्ण सामन्यात या 8 खेळाडूंपेक्षा एका षटकात जास्त धावा केल्या.

ऋषभ पंतच्या फॉर्ममुळे भारताच्या इतर यष्टीरक्षक फलंदाजांची झोप उडाली असती. केएल राहुल, इशान किशन, संजू सॅमसन, जितेश शर्मा, ध्रुव जुरेलसारखे यष्टिरक्षक आता टी-20 वर्ल्ड कप संघाच्या शर्यतीत ऋषभ पंतपेक्षा मागे पडले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

TVK West Bengal Expansion : तमिळनाडूनंतर आता 'या' राज्यातही विजय यांच्या 'टीव्हीके'ची एन्ट्री? पक्ष कार्यालय उद्घाटनानंतर राजकीय चर्चांना उधाण

Maharashtra Drought : मराठवाडा, विदर्भात १२ शेतकऱ्यांनी संपविला जीवन

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

SCROLL FOR NEXT