Rishabh Pant Risk of Getting a One-Match Ban IPL 2024  esakal
IPL

Rishabh Pant IPL 2024 : दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत होऊ शकतो एका सामन्यासाठी बॅन; काय आहे नेमकं प्रकरण?

अनिरुद्ध संकपाळ

Rishabh Pant Risk of Getting a One-Match Ban IPL 2024 : दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतला यंदाच्या आयपीएल सामन्यात एका सामन्यासाठी बंदीचा सामना करावा लागू शकतो. दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारावर आधीच दोनवेळी दंडात्मक कारवाई झाली आहे. ही कारवाई गेल्या दोन सामन्यात स्लो ओव्हर रेट ठेवल्यामुळे करण्यात आली होती. जर त्याने पुन्हा एकदा अशीच चूक केली तर त्याला बंदीता सामना करावा लागू शकतो.

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत शुक्रवारी झालेल्या सामन्यात बंदीपासून थोडक्यात वाचला होता. पंतच्या नेतृत्वाखालील संघ 16 व्या षटकापर्यंत वेळेच्या मागे होता. मात्र त्यानंतर त्यांनी वेगाने षटके टाकत ही षटकांचा कोटा वेळेत संपवला.

आयपीएलच्या नियमानुसार षटकांच्या संथ गतीसाठी कर्णधाराला पहिल्यांदा 12 लाख रूपयांचा दंड होतो. त्यानंतर दुसऱ्यावेळी देखील त्यानं हीच चूक केली तर त्याला 24 लाखाचा दंड होतो. याचबरोबर प्लेईंग 11 मधील प्रत्येक खेळाडूला 6 लाख रूपये किंवा सामना फीच्या 25 टक्के रक्कम दंड म्हणून द्यावी लागते.

जर तिसऱ्यांदा देखील संघाने तीच चूक केली अन् षटकांची गती संथ राखली. तर दंडाची रक्कम 30 लाख रूपये आणि कर्णधारावर एका सामन्याची बंदी येते. ऋषभ पंत आणि दिल्ली कॅपिटल्सवर सलग दोन सामन्यातषटकांची गती संथ ठेवल्यानं कारवाई झाली आहे. जर आता तिसऱ्यांदा पंतने हीच चूक केली तर त्यावर एका सामन्याची बंदी येऊ शकते.

(IPL Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Update: LPG कनेक्शनबाबत सरकारची मोठी अपडेट! 14.2 किलोच्या घरगुती सिलेंडरवर काय निर्णय?

AI आणि रोबोट्समुळे नोकऱ्या धोक्यात! बिल गेट्स यांना चिंता; ‘ह्यूमन रिजर्व्ड’चा फॉर्म्युला सुचवला, आरक्षणाची मागणी

Pancreatic Cancer Breakthrough: कॅन्सर उपचारात महत्त्वाची बातमी! पॅनक्रियाटिक कॅन्सरविरोधात मोठं यश; नव्या औषधाला FDAची मंजुरी

शिवीगाळ करणाऱ्याला श्वेता तिवारीने शिकवला धडा; शोधून काढत लेखी माफीनामा घेतला

Numerology: गर्दीतही वेगळी ओळख! इतर लोकांपेक्षा वेगळा विचार का करतात 'या' मूलांकाचे लोक? ट्रेंड फॉलो करत नाहीत...

SCROLL FOR NEXT