Rishabh Pant Say Sorry to Avesh Khan
Rishabh Pant Say Sorry to Avesh Khan  esakal
IPL

ऋषभ पंतने आवेश खानची कोलकात्यात पोहचताच का मागितली माफी?

अनिरुद्ध संकपाळ

नवी दिल्ली : वेगवान गोलंदाज आवेश खान (Avesh Khan) हा आयपीएल इतिहासात सर्वात महागडा अनकॅप्ड खेळाडू आहे. त्याला यंदाच्या आयपीएल लिलावात (IPL 2022 Auction) लखनौ सुपरजायंटने तब्बल 10 कोटी रूपयाला खरेदी केले. सध्या आवेश खान आपल्या आयुष्यातील पर्पल पॅच मधून जात आहे. त्याने गेल्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सकडून (Delhi Capitals) दमदार कामगिरी केली होती.

ज्यावेळी बंगळूरमध्ये आयपीएल लिलाव (IPL Auction) सुरू होता त्यावेळी आवेश खान भारतीय संघासोबत प्रवास करत होता. ज्यावेळी लखनौ सुपरजायंटने आवेश खानला 10 कोटी रूपये देऊन विकत घेतले त्यावेळी संघातील काही खेळाडूंनी त्याचे अभिनंदन केले. मात्र कोलकातामध्ये पोहचताच दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत (Rishabh Pant) आवेश खानला असे काही बोलला जे आवेश खानच्या कायम लक्षात राहणार.

एका मुलाखतीदरम्यान, आवेश खान म्हणाला की, ऋषभ पंत माझ्या जवळ आला आणि मला मिठी मारून सॉरी म्हणाला. तो आवेश खानला खरेदी करू शकला नाही, दिल्ली कॅपिटल्समध्ये परत आणू शकला नाही म्हणून त्याने आवेश खानला सॉरी म्हटले. आवेश खान याबाबत म्हणाला की, 'दिल्ली कॅपिटल्सकडे मोठी रक्कम शिल्लक नव्हती. तसेच त्यांना अजून बरेच खेळाडू खरेदी करायचे होते. दिल्लीने माझ्यासाठी 8.75 कोटी रूपयापर्यंत बोली लावली होती. मात्र अखेर लखनौने (LSG) बाजी मारली.'

आवेश खान मध्यप्रदेशकडून खेळतो. त्याने सांगितले की त्याचे ऋषभ पंतबरोबरचे नाते खास आहे. आम्ही दोघे U19 क्रिकेट एकत्र खेळलो आहे. सामना झाल्यानंतर आम्ही एकमेकांसोबत खूप दंगामस्ती करतो. याचबरोबर रिकी पाँटिंग (Ricky Ponting) यांच्या कोचिंग टिप्स देखील मिस करणार असे आवेश खान म्हणाला. त्याने सांगितले की त्याचे दिल्ली कॅपिटल्स बरोबर एक वेगळेच नाते होते. आवेश खानने 2021 च्या आयपीएलमध्ये 16 सामन्यात 7.37 च्या सरासरीने 14 विकेट्स घेतल्या होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: अक्षर पटेलने दिल्लीला मिळवून दिलं पहिलं यश; सुनील नारायण स्वस्तात बाद

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT