CSK IPL 2024 sakal
IPL

CSK IPL 2024 : धोनीपर्व अस्ताकडे... ; मराठमोळा ऋतुराज चेन्नईचा कर्णधार

आयपीएल स्पर्धा सुरू होण्यास काही तास शिल्लक असतानाच सर्वांसाठी धक्कादायक आणि आश्चर्यचकित करणारी घटना घडली.

सकाळ वृत्तसेवा

चेन्नई : आयपीएल स्पर्धा सुरू होण्यास काही तास शिल्लक असतानाच सर्वांसाठी धक्कादायक आणि आश्चर्यचकित करणारी घटना घडली. चेन्नई सुपर किंग्ज संघाचा यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने कर्णधारपद सोडले असून मराठमोठ्या ऋतुराज गायकवाडकडे नेतृत्वाची जबाबदारी दिली. या बदलामुळे धोनीची ही अखेरची आयपीएल असण्याचे संकेत मिळू लागले.

२००८ मध्ये आयपीएल सुरू झाल्यापासून धोनी चेन्नई संघाचा कर्णधार आहे. २०२२ च्या मोसमात रवींद्र जडेजाकडे नेतृत्वाची धुरा देण्यात आली होती; परंतु हा बदल यशस्वी ठरला नाही. त्यामुळे धोनीने पुन्हा ही जबाबदारी स्वीकारली होती. आता यंदा मोसमाच्या सुरुवातीलाच धोनीऐवजी ऋतुराज हा बदल करण्यात आला.

ऋतुराज गायकवाड २०२० मध्ये चेन्नई संघात दाखल झाला. त्यानंतर गतमोसमापर्यंत तो ५२ सामने खेळला आहे. ऋतुराजने देशांतर्गत स्पर्धेत काही सामन्यांत महाराष्ट्राचे नेतृत्व केले आहे, तसेच हाँग चौऊ येथील आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने सुवर्णपदक जिंकलेले आहे. ऋतुराजने आतापर्यंत भारतीय संघाचे ५ एकदिवसीय सामन्यांत, तर १९ ट्वेन्टी-२० सामन्यांत प्रतिनिधित्व केलेले आहे.

धोनी जे काही निर्णय घेतो ते चेन्नई संघाचे हित समोर ठेवूनच घेत असतो. आयपीएलसाठी कर्णधारांची बैठक होती. त्याच्या काही काळ अगोदर मला हा बदल समजला. धोनीच्या निर्णयाचा आम्ही सर्व जण आदर करत असतो.

- काशी विश्वनाथ, चेन्नई संघाचे सीईओ

ऋतुराजचा फॉर्म

लयबद्ध सलामीवीर असलेल्या ऋतुराजने आयपीएलमध्ये चांगला प्रभाव पाडलेला आहे. गतवर्षी चेन्नई संघाने जिंकलेल्या विजेतेपदामध्ये त्याने १६ सामन्यांत १४७.५० च्या सरासरीने ५९० धावा फटकावल्या होत्या. २०२१ मधील स्पर्धेतही अशीच कामगिरी करताना १६ सामन्यांत ६३५ धावांचा डोंगर उभा केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

Crime: पक्षातील सदस्याला अडकवण्यासाठी घरात स्फोटके आणि दारू ठेवली, पण काँग्रेस नेता स्वत:च अडकला अन्...; काय घडलं?

दुर्दैवी घटना! 'सख्ख्या काकाच्या पिकअपखाली सापडून चिमुरड्याचा मृत्यू'; आंबेगाव तालुक्यातील घटना, कुटुंबीयांचा आक्रोश

INDW vs PAKW सामन्यात वाद! पाकिस्तानी फलंदाज विकेटनंतरही मैदान सोडेना, कर्णधाराचीही अंपायरसोबत चर्चा; भारताचं मात्र सेलिब्रेशन

INDW vs PAKW, Video: पाकिस्तानचा पोपट झाला! जेमिमाहला रोड्रिग्सच्या विकेटसाठी सेलीब्रेशन करत होते अन् अचानक...

SCROLL FOR NEXT