Rohit Sharma Celebrating Holi Sakal
IPL

Rohit Sharma Holi: लालेलाल हिटमॅन...! मुंबई इंडियन्सने शेअर केला धुळवडीचा खास Video

Mumbai Indians Video: रोहित शर्माचा धुळवड खेळतानाचा व्हिडिओ मुंबई इंडियन्सने शेअर केला आहे.

Pranali Kodre

Rohit Sharma Holi: भारतभरात होलिका दहनानंतर दुसऱ्या दिवशी धुळवड किंवा धुलिवंदन साजरा केला जातो. रंगांची होळी खेळत अनेकांनी हा दिवस साजरा केला आहे. या धुळवडीचे अनेक फोटो आणि व्हिडिओ देखील सध्या व्हायरल होत आहेत.

विशेष म्हणजे सध्या भारतात इंडियन प्रीमियर लीगचा (IPL) 17 वा हंगाम सुरु आहे. त्यामुळे या स्पर्धेत सहभागी संघातील खेळाडूंनीही एकमेकांबरोबर रंगांची होळी खेळत हा दिवस साजरा केला आहे.

मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माने देखील जोरदार धुळवड साजरी केली आहे. त्याचा व्हिडिओ मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रोहित रंगामध्ये माखलेला दिसत आहे. तसेच त्याचा चेहरा पूर्ण लाल रंगात माखलेला दिसत आहे. त्याचबरोबर तो इतरांवर पाणी उडवतानाही दिसत आहे.

मुंबई इंडियन्सचा पराभव

आयपीएल 2024 स्पर्धेला 22 मार्चपासून सुरुवात झाली असून आत्तापर्यंत 5 सामने खेळून झाले आहेत. मुंबई इंडियन्सने पहिला सामना गुजरात टायटन्सविरुद्ध खेळला आहे. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झाला. या सामन्यात गुजरात टायटन्सने 6 धावांनी विजय मिळवला.

या सामन्यात गुजरात टायटन्सने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 168 धावा केल्या आहेत. गुजरातकडून साई सुदर्शनने सर्वाधिक 45 धावा केल्या. तसेच कर्णधार शुभमन गिलने 31 धावांची खेळी केली. मुंबईकडून गोलंदाजी करताना जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या आहेत.

त्यानंतर मुंबई इंडियन्सने 169 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 20 षटकात 9 बाद 162 धावा केल्या. मुंबईकडून डेवाल्ड ब्रेविसने सर्वाधिक 46 धावांची खेळी केली, तसेच रोहित शर्माने 43 धावा केल्या. गुजरातकडून अझमतुल्लाह ओमरझाई, उमेश यादव, स्पेन्सर जॉन्सन आणि मोहित शर्मा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Dry Day राज्यात २९ ठिकाणी ४ दिवस ड्राय डे, १३ ते १६ जानेवारीपर्यंत मद्यपानास मनाई

Stock Market Today : जागतिक अस्थिरतेमुळे शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 500 अंकांनी खाली; सोनं मात्र तेजीत; कोणत्या शेअर्सला फटका?

T20 World Cup : बांगलादेशची ICC कडून कोंडी! देश नव्हे, फक्त शहर बदलण्याचा ठेवला प्रस्ताव; हेही मान्य न केल्यास...

Bigg Boss विजेता शिव ठाकरे अडकला विवाहबंधनात, गुपचूप बांधली लग्नगाठ, सोशल मीडियावर लग्नातले फोटो व्हायरल

MLA Sangram Jagtap: व्हीजनरी उमेदवार निवडून द्यावेत:आमदार संग्राम जगताप; सुख- दुःखात साथ देणाऱ्यांच्या पाठीशी रहा!

SCROLL FOR NEXT