Rohit Sharma T20 Records MI vs SRH  esakal
IPL

Rohit Sharma MI vs SRH : रोहित शर्माने ठेवले विराटच्या पावलावर पाऊल, केला मोठा माईलस्टोन पार!

अनिरुद्ध संकपाळ

Rohit Sharma T20 Records MI vs SRH : मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने संघाला अत्यंत गरज असताना अर्धशतक ठोकत प्ले ऑफचे स्वप्न जिवंत ठेवले. सनराईजर्स हैदराबादने ठेवलेल्या 201 धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि कॅमरून ग्रीन यांनी दुसऱ्या विकेटसाठी नाबाद शतकी भागीदारी रचत प्ले ऑफच्या दिशेने झंजावाती कूच केली आहे.

दरम्यान, मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने अर्धशतकी (37 चेंडूत 56 धावा) खेळी केली. त्याला ग्रीनने तुफान फटकेबाजी करत चांगली साथ दिली. याचवेळी रोहित शर्माने टी 20 क्रिकेटमध्ये एक मोठा माईल स्टोन पार केला. रोहित शर्माने टी 20 मधील आपल्या 11 हजार धावा पूर्ण केल्या. रोहित शर्मा आता भारताकडून टी 20 क्रिकेटमध्ये 11 हजार धावा पूर्ण करणारा फक्त दुसरा फलंदाज ठरला. यापूर्वी विराट कोहलीने टी 20 क्रिकेटमध्ये 11 हजार धावा ठोकल्या आहेत. विराट कोहलीच्या 11868 धावा झाल्या आहेत.

याचबरोबर रोहित शर्मा हा आयपीएल इतिहासात एकाच संघाकडून 5000 पेक्षा जास्त धावा करणारा देखील दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. यापूर्वी विराट कोहलीने आरसीबीकडून 7162 धावा केल्या आहेत. तर रोहित शर्माने मुंबई इंडियन्सकडून 5021 धावा केल्या.

सनराईजर्स हैदराबादने ठेवलेल्या 201 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने दमदार सुरूवात केली. इशान किशन 14 धावांवर बाद झाल्यानंतर आलेल्या कॅमरून ग्रीनने पहिल्यापासूनच आक्रमक फटकेबाजी करण्यास सुरूवात केली. दुसऱ्या बाजूने रोहित शर्मा सावध फलंदाजी करत भागीदारी वाढवण्याच्या प्रयत्नात दिसला.

या दोघांनी पॉवर प्लेमध्ये 60 धावा ठोकल्या. पॉवर प्लेनंतर रोहितनेही आपला गिअर बदलला. दरम्यान, कॅमरून ग्रीनने आपले अर्धशतक 20 चेंडूत पूर्ण केले. या दोघांनी नवव्या षटकातच मुंबईला शंभरी पार करून दिली. या दोघांनी आपली भागीदारी शतकी केली. रोहितनेही अर्धशतक पूर्ण केले. मात्र त्याला मयांक दागरने 56 धावांवर बाद केले.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

B.Arch Admission Round 3 : बी. आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी जाहीर; ७५८ विद्यार्थ्यांना नवी संधी, ५३६ जणांचे ऑटो फ्रिज प्रवेश निश्चित

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

SCROLL FOR NEXT