rohit sharma gave big statement after mumbai indians lose against punjab kings
rohit sharma gave big statement after mumbai indians lose against punjab kings  
IPL

IPL 2023 : "आमच्याकडून काही चुका झाल्या पण..." पराभवाचे खापर कर्णधार रोहितने कोणाच्या माथी फोडले

Kiran Mahanavar

IPL 2023 Rohit Sharma : आयपीएल 2023च्या 31व्या सामन्यात पंजाब किंग्जच्या संघाने मुंबई इंडियन्सचा 13 धावांनी पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पंजाब संघाने 8 गडी गमावून 214 धावा केल्या. याला प्रत्युत्तर देताना मुंबई संघ 6 गडी गमावून केवळ 201 धावाच करू शकला. सलग तीन विजयानंतर मुंबई संघाचा हा पहिलाच पराभव आहे. या सामन्यानंतर मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने मोठे वक्तव्य केले आहे.

मुंबईच्या पराभवावर रोहित काय म्हणाला?

पंजाब किंग्जविरुद्ध मोठ्या धावसंख्येच्या सामन्यात 13 धावांनी पराभव झाल्यानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, संघातील खेळाडूंनी त्यांचे मनोबल राखावे. 19व्या षटकानंतर मुंबईची स्थिती चांगली होती जेव्हा त्यांना विजयासाठी 16 धावांची गरज होती आणि त्यांच्या 6 विकेट्स शिल्लक होत्या. अर्शदीप सिंगने मात्र या षटकात केवळ दोन धावा देत दोन विकेट घेतल्या.

आमच्याकडून काही चुका झाल्या पण आम्ही त्याकडे जास्त लक्ष देणार नाही, असे रोहितने सामन्यानंतर सांगितले. खेळाडूंना मनोबल टिकवून ठेवण्यास सांगणार आहे. रोहितने सांगितले की, आम्ही आतापर्यंत 6 सामने खेळले असून तीन जिंकले आहेत आणि तीन हरले आहेत. टूर्नामेंटमध्ये बराच वेळ शिल्लक आहे, आम्हाला ट्यून राहण्याची गरज आहे.

रोहितने आपल्या संघाला सामन्यात टिकवून ठेवल्याबद्दल सूर्यकुमार यादव आणि कॅमेरून ग्रीनचे कौतुक केले. पंजाबला विजय मिळवून देण्याचे श्रेय अर्शदीपला दिले. सूर्या आणि ग्रीन यांनी चांगली फलंदाजी करत आम्हाला शेवटपर्यंत सामन्यात रोखले, असे तो म्हणाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushil Kumar Modi: बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला! सुशील कुमार मोदी यांचं निधन

PM Modi: "बाळासाहेबांच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा सन्मान राखला गेला पाहिजे"; PM मोदींचा पुन्हा ठाकरेंना साद घालण्याचा प्रयत्न?

Chabahar Port: चीनच्या पाकिस्तानमधील ग्वादार बंदराला भारताचे 'चाबहार'ने प्रत्युत्तर; इराणसोबत ऐतिहासिक करार

Mumbai Local: पहिल्या वादळी पावसामुळे रेल्वे वाहतुकीचे तीन तेरा; मुंबईकरांचे दिवसभर अतोनात हाल!

लोकशाहीसाठी राज्यभर राबवली 'निर्भय बनो' मोहिम; पण विश्वंभर चौधरी स्वतः मतदानापासून राहिले वंचित; कारण काय?

SCROLL FOR NEXT