Rohit Sharma ipl broadcaster  esakal
IPL

Rohit Sharma : खासगी संभाषण उघड करणाऱ्या आयपीएल ब्रॉडकास्टरवर रोहितनं काढला जाळ

अनिरुद्ध संकपाळ

Rohit Sharma IPL Broadcaster Controversy : रोहित शर्माने आयपीएल ब्रॉडकास्टरवर सोशल मीडियावरून पोस्ट करत जाळ काढला. खासगी संभाषणाचे व्हिडिओ लीक करण्याचा आरोप करत रोहित शर्माने ब्रॉडकास्टर्सना इशाराच दिला.

आयपीएल ब्रॉडकास्टर्सनी मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्यावेळी रोहितच्या खासगी संभाषणाची क्लिप प्रक्षेपित केली होती. या क्लिपमध्ये रोहित शर्मा आणि केकेआरचा कोच अभिषेक शर्मा यांच्यातील संभाषण ऑडियोसकट प्रक्षेपित करण्यात आलं. यानंतर रोहितने ट्विट करून ब्रॉडकास्टर्सना खेळाडूच्या प्रयव्हसीचा आदर करत नसल्याबद्दल सुनावलं.

रोहित आणि नायर यांच्या संभाषणात रोहित नायरला सांगत होता की सर्व गोष्टी आता बदलल्या आहेत. आता त्यांच्यावर सर्व काही अवलंबून आहे. हा संघ मी तयार केला होता. हा माझा या संघाकडून शेवटचा हंगाम असेल असं देखील रोहित म्हणत होता. हे सर्व ब्रॉडकास्टर्सने रेकॉर्ड केलं. त्यानंतर केकेआरनं हा व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावर त्वरित हटवला.

दुसऱ्या एका घटनेत नायरसोबतच्या संभाषणावेळी रोहित शर्मा कॅमेऱ्यासमोर हात जोडताना दिसला. त्याने ब्रॉडकास्टर्सना संभाषण रेकॉर्ड न करण्याची विनंती केली. आधीच्या एका क्लिपमुळे त्याच्या अडचणीत मोठी वाढ झाली होती.

रोहित शर्मा मुंबई केकेआर सामन्यानंतर केकेआरच्या ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंसोबत चर्चा करताना दिसला होता. त्यानंतरच रोहित शर्मा पुढच्या हंगामात मुंंबईला राम राम ठोकून केकेआरवासी होणार का अशी चर्चा सुरू झाली होती. त्यातच रोहितने मुंबईचा कोच मार्क बाऊचरला त्यानं भविष्याबाबत अजून काही ठरवलं नाही. आता त्याचा फोकस फक्त टी 20 वर्ल्डकप असल्याचं सांगितलं होतं. यावरून तो मुंबईला सोडचिठ्ठी देणार असल्याच्या चर्चेला बळ मिळालं.

(IPL 2024 Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

Mumbai : आमचं नातं शरीर संबंधाच्या पलिकडचं, आजही...; विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षिकेचा खळबळजनक दावा

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

SCROLL FOR NEXT