Rohit Sharma Shubman Gill  esakal
IPL

Rohit Sharma Shubman Gill : आशा आहे की शुभमन असाच... भारतीय कर्णधाराने व्यक्त केली रास्त अपेक्षा

अनिरुद्ध संकपाळ

Rohit Sharma Shubman Gill : आयपीएल 2023 च्या क्वालिफायर 2 सामन्यात गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा 62 धावांनी पराभव केला. गुजरातने सलग दुसऱ्या हंगामात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आता ते चारवेळा आयपीएलवर नाव कोरणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जशी रविवारी भिडणार आहेत.

शुभमन गिलने 129 धावांची धडाकेबाज खेळी करत हंगामातील आपले तिसरे शतक ठोकले. या शतकी खेळीच्या जोरावर गुजरातने मुंबईसमोर विजयासाठी 234 धावांचे मोठे आव्हान ठेवले होते. मुंबईनेही झुंजार फलंदाजी करत सामन्यात रंगत निर्माण केली होती. तिलक वर्माने 14 चेंडूत 43 धावा चोपल्या. तर सूर्यकुमार यादवने 61 धावांची खेळी केली.

जोपर्यंत सूर्यकुमार यादव क्रीजवर होता तोपर्यंत मुंबईच्या विजयाच्या आशा जिवंत होत्या. मात्र गुजरातचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहित शर्माने अवघ्या 10 धावात मुंबईचा निम्मा संघ गारद केला. त्यात सूर्याचा देखील समावेश होता. यानंतर मुंबईचा डाव 171 धावात संपुष्टात आला.

मुंबईच्या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माने प्रतिक्रिया दिली. त्याने शुभमन गिलची पाठ थोपटतानाच त्याच्याकडून एक अपेक्षा देखील व्यक्त केली. रोहित म्हणाला की, 'शुभमन गिलने चांगली फलंदाजी केली. खेळपट्टी फलंदाजीला पोषक होती. त्यांनी 20 ते 25 धावा जास्त केल्या. आम्ही पहिल्या हाफपर्यंत सकारात्मक खेळलो. आपल्याला शुभमनला श्रेय द्यावं लागेल. मला आशा आहे की त्याचा फॉर्म असाच रहावा.'

रोहित ग्रीन आणि सूर्याबद्दल म्हणाला, 'ग्रीन आणि सूर्याने चांगली फलंदाजी केली मात्र आम्ही लय गमावली. आम्ही सकारात्मक आणि चांगली लढत देण्याचा प्रयत्न केला. मात्र आम्हाला पॉवर प्लेमध्ये चांगल्या धावा करता आल्या नाहीत. आम्ही गुजरातप्रमाणे एक फलंदाज सामना शेवटपर्यंत घेऊन जाईल अशी अपेक्षा केली होती. खेळपट्टी चांगली होती. सीमारेषा देखील छोट्या होत्या. मात्र गुजरात ज्या प्रकारे खेळली विजयाचे श्रेय त्यांनाच जाते.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Malegaon Protest : मालेगाव अत्याचार प्रकरणी जन आक्रोश मोर्चा, आंदोलकांचा कोर्टात शिरण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून लाठीमार

Donald Trump: साडेतीनशे टक्के शुल्क लावणार होतो; ट्रम्प यांच्याकडून संघर्ष थांबविल्याचा पुनरुच्चार

Latest Marathi News Live Update : मालेगावात आंदोलकांचा कोर्टात शिरण्याचा प्रयत्न

Viral Video Teacher : शाळेतच मुख्याध्यापकाचा इंग्लिश नजराणा! प्रार्थना सुरू असताना कांबळे सर टल्ली होऊन नाचू लागले अन् व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल...

Pandit Deshmukh Murder Case: कोण होते पंडित कमलाकर देशमुख, कशी झाली होती हत्या? सोलापूर हादरवणारी Exclusive माहिती

SCROLL FOR NEXT