Rohit Sharma | Mumbai Indians | IPL 2024
Rohit Sharma | Mumbai Indians | IPL 2024 Sakal
IPL

IPL 2024, MI vs RR: वानखेडेवर हार्दिकला ट्रोल करणाऱ्या चाहत्यांना पाहून रोहितनं काय केलं? Video होतोय व्हायरल

प्रणाली कोद्रे

Mumbai Indians News: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात सोमवारी (1 एप्रिल) झाला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात राजस्थान रॉयल्सने 6 विकेट्सने विजय मिळवला. दरम्यान, या सामन्यात मुंबईचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या एका कृतीने चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

रोहितच्या जागेवर हार्दिकला मुंबईने कर्णधार केल्यापासून चाहत्यांकडून सातत्याने हार्दिक ट्रोल होत आहे. स्टेडियमवरही हार्दिकची हुर्यो उडवली जात आहे. अशातच रोहितने क्षेत्ररक्षण करताना वानखेडेवरील प्रेक्षकांना हार्दिकला ट्रोल करण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न केला.

झाले असे की सोमवारी झालेल्या सामन्यात मुंबईने राजस्थानला 126 धावांच्या आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग राजस्थान करत असतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसते की रोहित बाउंड्री लाईनवर क्षेत्ररक्षण करत होता. यावेळी प्रेक्षकांकडून हार्दिकला ट्रोल केले जात होते. पण त्यावेळी त्याने हातवारे करत प्रेक्षकांना शांत करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे. दरम्यान हा व्हायरल व्हिडिओ असल्याने त्याची पुष्टी सकाळ करत नाही.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की केवळ वानखेडेवरच नाही, तर यापूर्वी मुंबईने अहमदाबाद आणि हैदराबादला खेळलेल्या सामन्या दरम्यानही हार्दिकविरुद्ध चाहत्यांनी नारेबाजी केली होती.

तसेच सोमवारी झालेल्या सामन्याआधीही नाणेफेकीवेळी चाहते हार्दिकला ट्रोल करत असताना माजी कर्णधार आणि समालोचक संजय मांजरेकरांनी त्यांना फटकारले होते.

हार्दिक का होतोय सातत्याने ट्रोल?

हार्दिक यापूर्वी 2015 ते 2021 दरम्यान मुंबई इंडियन्सकडून खेळला होता. परंतु, 2022 मध्ये मुंबईने त्याला करारमुक्त केल्यानंतर त्याला गुजरात टायटन्सने संघात घेतले आणि कर्णधारपदही दिले.

हार्दिकच्या नेतृत्वात गुजरातने 2022 मध्ये आयपीएलचे विजेतेपद मिळवले, तसेच 2023 मध्ये गुजरातने उपविजेतेपद मिळवले. पण त्यानंतर 2024 आयपीएल लिलावानंतर लेगचच मुंबईने हार्दिकला गुजरातकडून ट्रेड करून संघात घेतले आणि पाचवेळच्या आयपीएल विजेता कर्णधार रोहितच्या जागेवर नेतृत्वपदही दिले.

मुंबईने घेतलेल्या या अचानक निर्णयामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला, तसेच वादालाही तोंड फुटले. रोहितला बाजूला करून हार्दिककडे नेतृत्व देणे, हे अनेकांना पसंत पडले नाही. त्यामुळे हार्दिक गेल्या काही महिन्यापासून सातत्याने ट्रोल होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: महाराष्ट्रात मतदारांमध्ये अनुत्साह, अकरा वाजेपर्यंत अवघे 16 टक्के मतदान

Bangladesh MP Missing: भारतात आलेला बांगलादेशचा खासदार 3 दिवसांपासून बेपत्ता; कुटुंबाकडून चिंता व्यक्त

RSS नंतर आता दिग्विजय सिंह यांनी CM योगींचे केले कौतुक मात्र मोदींवर खोचक टीका, नेमकं काय म्हटलं वाचा...

Healthy Tips: आता कमी वयातच पोटाचा वाढतोय घेर, जास्त चरबीमुळे हृदयविकार, मधुमेह, आजारांना निमंत्रण

MS Dhoni Retirement : "एमएस धोनीने मॅनेजमेंटला सांगितले..." थालाच्या निवृत्तीवर CSK अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT