IPL 2024 Romario sakal
IPL

IPL 2024 Romario : रोमारिओने दिले पोलार्ड यांना श्रेय

कोणताही मागचा-पुढचा विचार न करता बिनधास्त फलंदाजी कर, असा सल्ला मला फलंदाजीचे प्रशिक्षक कायरन पोलार्ड यांनी दिला होता आणि मी क्षणाचाही विलंब न लावता प्रत्येक चेंडू सत्कारणी लावला, असे मत मुंबई इंडियन्सच्या विजयाचा शिलेदार रोमारिओ शेफर्डने व्यक्त केले.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोणताही मागचा-पुढचा विचार न करता बिनधास्त फलंदाजी कर, असा सल्ला मला फलंदाजीचे प्रशिक्षक कायरन पोलार्ड यांनी दिला होता आणि मी क्षणाचाही विलंब न लावता प्रत्येक चेंडू सत्कारणी लावला, असे मत मुंबई इंडियन्सच्या विजयाचा शिलेदार रोमारिओ शेफर्डने व्यक्त केले.

आयपीएलमधील आपला दुसराच सामना खेळणाऱ्या रोमारिओने रविवारी वानखेडे स्टेडियमवर झंझावात सादर केले. मुंबईच्या डावातील अखेरचे १३ चेंडू शिल्लक असताना तो मैदानात आला आणि फलंदाजीस मिळालेल्या १० चेंडूंत त्याने नाबाद ३९ धावांची खेळी साकार केली. यातील ३२ धावा तर त्याने अखेरच्या षटकात फटकावल्या. त्यामुळे मुंबईला दिल्लीविरुद्धचा हा सामना २९ धावांनी जिंकता आला.

तब्बल ३९० च्या स्टाईक रेटने फटकेबाजी करणाऱ्या रोमारिओसाठी आयपीएल नवीन नाही. २०२२ मध्ये हैदराबाद संघाने ५० लाखांत त्याला आपल्या संघात घेतले होते; परंतु तो तीनच सामने खेळला होता. २०२३ मध्ये तो लखनौ संघात होता; परंतु तेथे त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. यंदा मुंबई संघाने त्याला लखनौ संघातून आपल्याकडे ट्रेड केले.

रविवारी साकार केलेल्या खेळीचे श्रेय रोमारिओने पोलार्ड यांना दिले. पहिल्या चेंडूपासून आक्रमण करण्याची पोलार्ड यांची खासियत होती. रोमारिओने त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून मुंबई इंडियन्ससाठी संधी मिळातच मॅच विनिंग खेळी केली. मी फलंदाजीस जात असताना पोलार्ड यांनी दिलेले प्रोत्साहन मौल्यवान ठरले, असे रोमारिओ म्हणाला.

मी फलंदाजीस गेलो तेव्हा १३ चेंडू शिल्लक होते. त्यामुळे संपूर्ण सपोर्ट स्टाफने दिलेला सल्ला माझ्यासाठी स्पष्ट होता. कोणताही इतर विचार न करता मी प्रत्येक चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, असे रोमारिओने सांगितले.

माझी खेळी स्फोटक ठरली असली तरी आम्ही स्पर्धेत मिळवलेला हा पहिला विजय त्यापेक्षा मोठा होता. या सामन्याअगोदर आम्ही तळाच्या स्थानावर होतो. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत विजय आवश्यक होता. या विजयात सर्वांचे योगदान मोलाचे ठरले, अशीही भावना रोमिरिओने व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी मंडपात वीज कनेक्शन हवंय? BEST च्या ११ अटी पूर्ण करा, ELCB रिपोर्टही द्यावा लागणार, नवे नियम काय?

MS DHONI CSK STAKE CONTROVERSY: धोनीला CSKमध्ये २५ टक्के हिस्सा हवा होता? दाव्याने खळबळ, आकाश चोप्रांनी सांगितलं नेमकं सत्य

‘मराठी डाऊनमार्केट भाषा आहे असं सांगण्यात आलं’ चिन्मयी सुमीत यांनी सांगितला मुंबईतील जीमचा धक्कादायक अनुभव

सणासुदीत अन्नसुरक्षेवर FDAची नजर! शाळा, अंगणवाड्यांसह सेंट्रल किचनची तपासणी; नवे आदेश जारी करणार

Marathi News Live Updates : जर मला एखाद्याला विरोध करायचा असेल, तर तसा करण्याचा मला पूर्ण अधिकार आहे - मिलिंद देवरा

SCROLL FOR NEXT