rcb last chance to stay in playoff race play sunrisers hyderabad News Marathi sakal
IPL

RCB कडे शेवटची संधी... आज हरली तर IPL मधून जाणार बाहेर; धावांचा पाऊस पाडणाऱ्या हैदराबादशी सामना

सनरायझर्स हैदराबादचा संघ पॅट कमिन्सच्या नेतृत्वात यंदाच्या आयपीएलमध्ये धडाकेबाज खेळ करीत आहे. पहिल्या तीनपैकी फक्त एका लढतीत विजय मिळवल्यानंतर पुढील चारही लढतींमध्ये प्रतिस्पर्ध्यांना लोळवण्यात हैदराबादला यश मिळाले.

Kiran Mahanavar

सनरायझर्स हैदराबादचा संघ पॅट कमिन्सच्या नेतृत्वात यंदाच्या आयपीएलमध्ये धडाकेबाज खेळ करीत आहे. पहिल्या तीनपैकी फक्त एका लढतीत विजय मिळवल्यानंतर पुढील चारही लढतींमध्ये प्रतिस्पर्ध्यांना लोळवण्यात हैदराबादला यश मिळाले.

हैदराबादने चार वेळा दोनशेच्या वर, तर तीन वेळा अडीचशेच्या वर धावसंख्या उभारत प्रतिस्पर्ध्यांना इशारा दिला आहे. हैदराबादकडून विक्रमी धावांचा ओघ कायम राहण्याची शक्यता आहे.

बंगळूरच्या संघाचा सात पराभवांनंतर पाय खोलात गेला असून आता यापुढील प्रत्येक लढत त्यांच्यासाठी आव्हान कायम राखण्यापेक्षा प्रतिष्ठा कायम राखण्याच्या दृष्टीने महत्त्वाची असणार आहे.

बंगळूरसाठी विराट कोहलीने (३७९ धावा) व हैदराबादसाठी ट्रॅव्हिस हेडने (३२४ धावा) धावांचा रतीब उभारला आहे. दोघांमधील रस्सीखेच यापुढेही कायम राहील. हेडच्या झंझावाती फलंदाजीच्या जोरावर हैदराबादने दिल्लीविरुद्धच्या लढतीत पॉवरप्लेमध्ये विक्रमी धावसंख्या उभारली. अभिषेक शर्मा (२५७ धावा) हेडला सलामीला तोलामोलाची साथ देत आहे. हेनरिक क्लासेन (२६८ धावा) व एडन मार्करम (१६० धावा) या दक्षिण आफ्रिकन खेळाडूंकडून मोठ्या अपेक्षा आहेत. क्लासेनने चमक दाखवली असून मार्करमला कामगिरीत सातत्य राखण्याची गरज आहे.

नितीशकुमार रेड्डी (११५ धावा व तीन विकेट) याने गेल्या काही सामन्यांमध्ये गोलंदाजी तसेच फलंदाजी अशा दोन्ही विभागात ठसा उमटवला आहे. गोलंदाजी विभागात कर्णधार पॅट कमिन्स सातत्याने प्रभावी कामगिरी करीत आहे. त्याने सात सामन्यांमधून आठच्या सरासरीने नऊ फलंदाज बाद केले आहेत. टी. नटराजने हैदराबादकडून सर्वाधिक दहा फलंदाज बाद केले आहेत. भुवनेश्‍वरकुमारच्या गोलंदाजीवर सुरुवातीला आक्रमण करण्यात आले; पण गेल्या काही सामन्यांत त्याने समाधानकारक गोलंदाजी केली आहे. मयांक मार्कंडे, शाहबाज अहमद व वॉशिंग्टन सुंदर यांनी आपला खेळ उंचावण्याची गरज आहे.

गोलंदाजीत सुधारणा हवी

बंगळूरकडून सर्वाधिक विकेट यश दयाल याने मिळवलेले आहेत. त्याने सात फलंदाज बाद केले आहेत; मात्र यंदाच्या मोसमात सर्वाधिक विकेट मिळवणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत सध्या तो २६व्या स्थानावर आहे (ही आकडेवारी बुधवार रात्रीपर्यंतची आहे). याचाच अर्थ बंगळूरचा गोलंदाजी विभाग कमकुवत आहे. मोहम्मद सिराज, कॅमेरुन ग्रीन, लॉकी फर्ग्युसन ही स्टार मंडळी अपयशी ठरली आहेत. कर्ण शर्मा, मयांक डागर व विल जॅक्स यांच्याकडूनही निराशा झाली आहे.

विराटला साथ हवी

बंगळूरसाठी आयपीएलचा मोसम अत्यंत वाईट ठरला असला, तरी इतर लढतींमध्ये विजय मिळवण्यासाठी त्यांचा संघ प्रयत्नशील असेल; पण फलंदाजी विभागात त्याला इतर फलंदाजांकडून साथीची गरज आहे. फाफ ड्युप्लेसी (२३९ धावा), दिनेश कार्तिक (२५१ धावा), रजत पाटीदार (१६१ धावा) यांनीही सातत्याने चमकदार खेळ करायला हवा. कॅमेरुन ग्रीन, विल जॅक्स, महिपाल लोमरोर यांनी दबावाखाली खेळ उंचावण्याची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: ''पटेल, तटकरे, अरोरा..'', रोहित पवारांनी तिघांची नावं घेत केले गंभीर आरोप

Ulka Mahajan : पारितोषिकाने दुसऱ्या स्वातंत्र्य चळवळीसाठी ऊर्जा ;उल्का महाजन यांची भावना, ‘आंतरभारती’कडून कुसुम पुरस्काराने सन्मान

Latest Marathi News Live Update : अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम वर्गशिक्षकावर हल्ला

8th Pay Commission : 31 डिसेंबर 2025 पूर्वी निवृत्त झालेल्यांना सुधारित पेन्शन मिळणार का? सरकारचं संसदेत स्पष्ट उत्तर

Nashik Chain Snatching : नाशिक पोलिसांची मोठी कारवाई! सोन्याच्या पोत ओरबाडणारी युपीची गँग जेरबंद, ११ गुन्हे उघड

SCROLL FOR NEXT