Kartik-Tyagi-Chetan-Sakariya-Dance 
IPL

IPL 2021: राजस्थानच्या 'यंग ब्रिगेड'चा भन्नाट डान्स (Video)

विराज भागवत

कार्तिक, चेतनच्या भेदक माऱ्यामुळे राजस्थानचा विजय

IPL 2021: पंजाब किंग्सला १८५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना २० षटकांत १८३ धावाच करता आल्या. लोकेश राहुल आणि मयंक अग्रवाल या दोघांनी दमदार फटकेबाजी करत संघाला १२ षटकांमध्ये १२० धावांपर्यंत मजल मारून दिली होती. ही भागीदारी चेतन साकरियाने तोडली. त्या दोघांनंतर निकोलस पूरननेही २२ चेंडूत ३२ धावा केल्या. पण शेवटच्या १५ चेंडूत पंजाबच्या संघाला १० धावा करता आल्या नाहीत. कार्तिक त्यागीने शेवटच्या षटकात केवळ १ धावा देत पंजाबचा धक्कादायक पराभव केला. सामन्यात भेदक मारा करणाऱ्या कार्तिक आणि चेतनने सामना संपल्यानंतर मजा मस्ती केली.

पाहा मजा-मस्तीचा Video:

सामन्यात नक्की काय घडलं?

राजस्थानने फलंदाजी करत २० षटकात सर्वबाद १८५ धावा केल्या. सलामीवीर एव्हिन लुईस (३६) आणि यशस्वी जैस्वाल (४९) यांनी संघाला चांगली सुरूवात करून दिली होती. त्यानंतर तीच गती कायम ठेवणं काही फलंदाजांना जमली नाही. महिपाल लॉमरॉरने तुफान फटकेबाजी करत १७ चेंडूत ४३ धावा कुटल्या. त्यामुळे संघाला १८५ धावांपर्यंत मजल मारता आली.

या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबचे सलामीवीर राहुल (४९) आणि मयंक अग्रवाल (६७) यांनी १२० धावांची भागीदारी केली. हे दोघे बाद झाल्यावर निकोलस पूरनने (३२) फटकेबाजी केली. एडन मार्क्रमही दमदार फलंदाजी करत होता, पण शेवटच्या दोन षटकात त्याला फारशी फलंदाजी मिळाली नाही. शेवटच्या षटकात तर पंजाबच्या संघाला ४ धावाही करता आल्या नाहीत. कार्तिक त्यागीने शेवटच्या षटकात केवळ १ धाव देत दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI: टीम इंडियाच्या विजयाचा जल्लोष सुरू असतानाच स्टेडियममध्ये राडा! दोन तरुण भिडले, मारहाणीचा VIDEO व्हायरल; नेमकं काय घडलं?

Dam Leakage: डिंभे धरणाला गळतीचे ग्रहण; वर्षाला दोन टीएमसी पाणी वाया जाणार.

Jalgaon News: लग्नाच्या तिसऱ्या दिवशीच पतीसह तिघांना मारण्याचा प्रयत्न, विषप्रयोगानंतर नवविवाहिता फरार; जळगावातील धक्कादायक प्रकार

Latest Marathi News Live Update : लोकशाहीला सचोटीची गरज, निवडक संतापाची नाही; फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल

Navratri Day 2 : ब्रह्मचारिणी

SCROLL FOR NEXT