IPL 2024 RR vs LSG Playing-11 Marathi News sakal
IPL

IPL 2024 RR vs LSG : लखनौचा आज राजस्थान विरुद्ध सामना! दुखापतीनंतर पुनरागमन करणाऱ्या राहुलवर सर्वांचं लक्ष

IPL 2024 RR vs LSG Playing-11 : राजस्थान रॉयल्सविरुद्ध आज होणाऱ्या आयपीएल सामन्यातून लखनौ संघाचा कर्णधार केएल राहुलची तंदुरुस्ती आणि फॉर्म यावर फोकस असणार आहे.

Kiran Mahanavar

IPL 2024 RR vs LSG Playing-11 : राजस्थान रॉयल्सविरुद्ध आज होणाऱ्या आयपीएल सामन्यातून लखनौ संघाचा कर्णधार केएल राहुलची तंदुरुस्ती आणि फॉर्म यावर फोकस असणार आहे. राजस्थानचा संघ अधिक समतोल असल्यामुळे त्यांचे पारडे जड आहे.

पायाच्या दुखापतीमुळे केएल राहुल इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या चार कसोटी सामन्यांस मुकला होता; तर मांडीवर झालेल्या शस्त्रक्रियेमुळे तो गतवर्षी चार महिने क्रिकेटपासून दूर होता. त्यामुळे राहुलची तंदुरुस्ती चर्चेत राहिली आहे.

ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेवर लक्ष ठेवून राहुल आयपीएलमध्ये सुरुवातीच्या काही सामन्यांत तरी यष्टिरक्षण करणार नाही. राहुलचा अपवाद वगळता लखनौ संघाची फलंदाजी क्विन्टॉन डिकॉक, निकोलस पुरन आणि मार्कस स्टॉयनिस यांच्यावर आधारलेली असेल.

राजस्थान रॉयल्स : संजू सॅमसन (कर्णधार), जॉस बटलर, शुभम दुबे, शिमरॉन हेटमायर, यशस्वी जयस्वाल, ध्रुव जुरेल, टॉम कोहलर-कॅडमोर, रियान पराग, रोवमन पॉवेल, कुणाल सिंग राठोड, रविचंद्रन अश्विन, डोनोवन फरेरा, आवेश खान, ट्रेंट बोल्ट नांद्रे बर्गर, युझवेंद्र चहल, प्रसिध कृष्णा, नवदीप सैनी, संदीप शर्मा, कुलदीप सेन, आबिद मुश्ताक, तनुष कोटियन.

लखनौ सुपर जायंट्स: केएल राहुल (क), क्विंटॉन डी कॉक, निकोलस पूरन, आयुष बडोनी, काइल मेयर्स, मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, देवदत्त पडिक्कल, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, कृणाल पंड्या, युद्धवीर सिंग, प्रेरक मंकड, यश ठाकूर, अमित मिश्रा, शामर जोसेफ, मयंक यादव, मोहसीन खान, के. गौथम.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट! प्रत्येक लेव्हलचा फिटमेंट फॅक्टर असेल वेगळा; उद्या महत्त्वाची बैठक

गौतम गंभीरनं भारतीय क्रिकेटचं वाटोळं केलं, त्याने संघात राजकारण आणले...! खळबळजनक दाव्याने सारे चक्रावले

Latest Marathi News Live Update : भरधाव कारने पायी जाणा-या महिलेला चिरडले,महिलेचा जागीच मृत्यू

Raksha Khadse : "आमदारांच्या मुलींच्या हस्ते उद्घाटनं उरकताय का?" रक्षा खडसेंनी 'महावितरण'ला झापले

Dombivli Crime: नर्सने बोलणे बंद केले, रागात डॉक्टरने १० बिअर पिऊन ४५ झोपेच्या गोळ्या खाल्ल्या; त्यानंतर जे घडलं...

SCROLL FOR NEXT