RR vs RCB IPL 2023 Rajasthan Royals and Royal Challengers Bangalore  
IPL

RR vs RCB IPL 2023 : प्ले-ऑफसाठी काटे की टक्कर! डुप्लेसी विरुद्ध जैस्वाल कोण होणार ‘यशस्वी’

राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर यांच्यातील सामना प्लेऑफसाठी महत्त्वाचा

सकाळ ऑनलाईन टीम

RR vs RCB IPL 2023 : सवाई मानसिंग स्टेडियमवर आज सव्वाशेर होण्यासाठी यशस्वी जयस्वाल आणि फाफ डुप्लेसी यांच्यातील लढत प्रेक्षणीय ठरणार आहे. राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर यांच्यातील सामना दोघांसाठी प्लेऑफसाठी महत्त्वाचा आहे.

राजस्थानचा हरहुन्नरी फलंदाज यशस्वी कमालीच्या फॉर्मात आहे, तर बंगळूर संघाचा कर्णधार डुप्लेसीही तेवढीच आक्रमक फलंदाजी करत आहे. दोघेही सलामीवीर आहेत. त्यामुळे आज एकमेकांविरुद्ध या दोघांची कामगिरी कशी होते, याची उत्सुकता आयपीएल प्रेक्षकांना लागून राहिली आहे.

सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजासाठी असलेली ऑरेंज कॅप डुप्लेसीकडे आहे. त्याने ११ सामन्यांत सहा अर्धशतकांसह ५७६ धावा केल्या आहेत. ८४ ही त्याची सर्वाधिक खेळी आहे; तर दुसऱ्या बाजूला यशस्वीने १२ सामन्यांत ५७५ धावा फटकावल्या आहेत. यात त्याने चार अर्धशतकांसह एक १२४ धावांची खेळी साकार केली आहे. दोघांमध्ये एका धावेचे अंतर आहे. म्हणूनच दोघांमधील सामन्याची उत्कंठा वाढली आहे.

एकीकडे कर्णधार सर्वाधिक धावा करत असताना बंगळूर संघ मात्र गटांगळ्या खात आहे. आधी मुंबई इंडियन्सनंतर दिल्ली कॅपिटल्सकडून पराभूत झाल्यामुळे बंगळूरला सलग तिसरी हार टाळायची आहे; अन्यथा प्लेऑफसाठी त्यांचा मार्ग अधिकच बिकट होऊ शकतो.

राजस्थान संघाचीही तशीच अवस्था होती. सलग तीन पराभवांचा सामना केल्यानंतर कोलकतावर त्यांनी गुरुवारी दणकेबाज विजय मिळवला. यात यशस्वीने ४७ चेंडूत नाबाद ९८ धावांचा नजराणा सादर केला होता. प्लेऑफसाठी आव्हान कायम ठेवायचे असेल, तर त्यांनाही विजय आवश्यक आहे.

आजची लढत - राजस्थान वि. बंगळूर

स्थळ- जयपूर वेळ- दुपारी ३.३० पासून

प्रक्षेपण- स्टार स्पोर्टस्, जिओ सिनेमा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Soldier caught pigeon on border : भारत-पाकिस्तान सीमेजवळ जवानांनी पकडलं एका गंभीर धमकीच्या पत्रासह कबुतर!

बाप से बेटा सवाई! छोट्या किंग खान आर्यनचा व्हिडिओ पाहिला का? आवाज, दिसणं आणि स्टाइल सगळं काही तेच, व्हिडीओ होतोय व्हायरल

Pali News : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा सूत्रधार शोधण्यासह इतर मागण्यांचे तहसीलदारांना अंनिसकडून निवेदन

School Blast: शाळेबाहेर स्फोटके! विद्यार्थ्याने फेकताच भीषण स्फोट, महिला आणि विद्यार्थी जखमी

Maharashtra Latest News Update: नाशिकमधील गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग घटवला

SCROLL FOR NEXT