RR vs RCB Live Score IPL 2023 esakal
IPL

RR vs RCB : आरसीबीने राजस्थानचा केला तब्बल 112 धावांनी पराभव

Kiran Mahanavar

RR vs RCB IPL 2023 : रॉयल चॅलेंजर बेंगलोगच्या 172 धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्स झुंजार खेळ खरेल अशी अपेक्षा होती. मात्र डावाच्या पहिल्या षटकापासूनच राजस्थानच्या फलंदाजीला ग्रहण लागले. हे ग्रहण अखेर 10 व्या षटकात 112 धावांच्या पराभवानंतरच सुटले. आरसीबीच्या गोलंदाजांनी धडाकेबाज कामगिरी करत राजस्थानचा संपूर्ण संघ 59 धावात पॅव्हेलियनमध्ये धाडला. आरसीबीकडून वेन पार्नेलने सर्वाधिक 3 बळी टिपले. त्याला ब्रेसवेल, कर्ण शर्मा यांनी प्रत्येकी 2 तर मोहम्मद सिराज आणि ग्लेन मॅक्सवेलने प्रत्येकी 2 विकेट घेत चांगली साथ दिली. राजस्थानकडून हेटमायरने 19 चेंडूत 35 धावा केल्या.

करो या मरो सामन्यात आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र सावध सुरूवातीनंतर राजस्थानच्या फिरकीने आरसीबीच्या फलंदाजीला खिंडार पाडण्यास सुरूवात केली. आरसीबीची अवस्था 18 व्या षटकात 5 बाद 137 धावा अशी झाली असताना अर्जुन रावतने आपला दांडपट्टा सुरू करत 11 चेंडूत 29 धावा ठोकल्या. त्याच्या या आक्रमक खेळीमुळे आरसीबीने 171 धावांपर्यंत मजल मारली. आरसीबीकडून कर्णधार फाफ ड्युप्लेसिसने 55 तर ग्लेन मॅक्सवेलने 54 धावांची अर्धशतकी खेळी केली. राजस्थानकडून केएम आसिफ आणि अॅडम झाम्पाने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

राजस्थानची हाराकिरी

पहिल्या दोन षटकातच तीन फलंदाज बाद झाल्यानंतर जो रूट आणि देवदत्त पडिक्कल यांनी राजस्थानचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र ब्रेसवेलने पडिक्कलला 4 धावांवर तर वेन पार्नेलने जो रूटला 10 धावांवर बाद केले. यानंतर ब्रेसवेलने ध्रुव जुरेलला बाद करत राजस्थानची अवस्था 7 षटकात 6 बाद 31 धावा अशी केली.

यानंतर हेटमायरने काही आक्रमक फटके मारत राजस्थानला अर्धशतक पूर्ण करून दिले. मात्र त्याला साथ देणारा आर. अश्विन एक चोरटी धाव घेण्याच्या नादात शुन्यावर बाद झाला. यानंतर हेटमायरची देखील 19 चेंडूत 35 धावांचे केलेली झुंजार खेळी संपुष्टात आली. अखेर आरसीबीने राजस्थानचा संपूर्ण संघ 10 . 3 षटकात 59 धावात पॅव्हेलियनमध्ये धाडला. आरसीबीने 112 धावांनी सामना जिंकत आपले प्ले ऑफची आशा जिवंत ठेवली.

राजस्थानला दुसऱ्याच चेंडूवर मोठा धक्का

आरसीबीने 172 धावांचे आव्हान ठेवल्यानंतर राजस्थान हे आव्हान पार करण्यासाठी मैदानावर उतरला. मात्र डावाच्या दुसऱ्याच चेंडूवर राजस्थानला मोठा धक्का बसला. त्यांचा स्टार सलामीवीर यशस्वी जैसवालला मोहम्मद सिराजने शुन्यावर बाद केले. यानंतर पुढच्याच षटकात वेन पार्नेलने जॉस बटलरला देखील शुन्यावरच बाद करत राजस्थानचे दोन्ही धडाकेबाज सलामीवीर माघारी धाडले. या धक्क्यातून सावरतो न सावरतो तोच संघाचा कर्णधार संजू सॅमसन पार्नेलच्या याच षटकाच्या चौथ्या चेंडूवर 4 धावांवर बाद झाला.

अर्जुन रावतचा दांडपट्टा

मॅक्सेवेल बाद झाला त्यावेळी त्यावेळी डावातील फक्त काहीच षटके शिल्लक होती. या षटकात अर्जुन रावतने अखेरचा दांडपट्टा फिरवला. अर्जुन रावतने 11 चेंडूत नाबाद 29 धावा केल्या तर ब्रेसवेलने 9 चेंडूत 9 धावा करत आरसीबीला 20 षटकात 5 बाद 171 धावांपर्यंत मजल मारून दिली.

मॅक्सवेलचे अर्धशतक

आरसीबीने अवघ्या 1 धावेत 3 फलंदाज गमावल्यानंतर ग्लेन मॅक्सवेलने संघाला आधार दिला. त्याने 32 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र संदीप शर्माने मॅक्सवेलची ही अर्धशतकी खेळी 18 व्या षटकात संपवली. त्याने 56 धावांवर मॅक्सवेलचा त्रिपळा उडवत आरसीबीला पाचवा धक्का दिला.

आरसीबीला लागली गळती

ड्युप्लेसिस 55 धावांवर बाद झाला त्यावेळी आरसीबीच्या 14.5 षटकात 2 बाद 119 धावा झाल्या होत्या. मॅक्सवेलने 40 धावा करून एक बाजू लावून धरली होती. मात्र राजस्थानने आरसीबीला पाठोपाठ धक्के देण्यास सुरूवात केली. झाम्पाने महिपाल रोमरोरला 1 धावेवर बाद केले. त्यानंतर याच षटकात झाम्पाने दिनेश कार्तिकला शुन्यावर बाद करत आरसीबीची अवस्था 2 बाद 119 धावांवरून 4 बाद 120 धावा अशी केली.

विराटकडून निराशा

पॉवर प्लेनंतर आरसीबीने लगेच आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र त्यानंतर आसिफने विराट कोहलीला 18 धावांवर बाद केले. विराट कोहली बाद झाल्यानंतर आलेल्या ग्लेन मॅक्सवेल आणि कर्णधार फाफ ड्युप्लेसिसने 69 धावांची भागीदारी रचली. ड्युप्लेसिसने हंगामातील आपले सातवे अर्धशतक ठोकले. मात्र केएम आसिफनेच ड्युप्लेसिसला देखील 55 धावांवर बाद करत आरसीबीला मोठा धक्का दिला.

आरसीबीची पॉवर प्लेमध्ये सावध सुरूवात

रॉयल चॅलेंजर बेंगलोरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर विराट कोहली आणि फाफ ड्युप्लेसिस यांनी सावध सुरूवात करत 6 षटकात 42 धावांपर्यंत मजल मारली. विराट कोहली बॉल टू रन पद्धतीने खेळत होता. तर फाफा ड्युप्लेसिसने 19 चेंडूत 23 धावा केल्या होत्या.

RR vs RCB Live Score: शर्यत प्ले-ऑफची! आरसीबीने जिंकले नाणेफेक घेतला हा निर्णय

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) कर्णधार फाफ डुप्लेसिसने राजस्थान रॉयल्सविरुद्ध नाणेफेक जिंकली. त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI ECL Rule: आरबीआयच्या नवीन नियमांमुळे खासगी बँकांचे कर्ज महागणार? कोणत्या बँकांवर होणार परिणाम?

French PM Resigns: फ्रान्सची राजकीय अस्थिरता शिगेला! मंत्रिमंडळ नेमलं, पण पंतप्रधानांचा काही तासांत राजीनामा

Vijay Wadettiwar: ''काँग्रेसला मराठा समाजाने नाही तर...'', जरांगेंना उत्तर देताना वडेट्टीवारांचं मोठं विधान

Pune Traffic Police : मोशीत वाहतूक पोलिसाला मारहाण करणारे दोघे अटकेत; सिग्नल तोडल्याचे छायाचित्र काढल्याने वाद

Shocking News: हृदयद्रावक घटना ! पुराने हाता तोंडाशी आलेला घास हिरावला; शेतकऱ्याने दुसऱ्याच दिवशी जीवन संपवले

SCROLL FOR NEXT