Ruturaj Gaikwad Sakal
IPL

Ruturaj Gaikwad: चेपॉकवर ऋतु'राज'! विराटला मागे टाकत ऑरेंज कॅप तर पटकावलीच, पण धोनीचा विक्रमही मोडला

CSK vs PBKS, IPL 2024: ऋतुराज गायकवाडने चेन्नईचा कर्णधार म्हणून मोठा पराक्रम केला असून धोनीला मागे टाकले आहे. याशिवाय त्याने ऑरेंज कॅपही पटकावली.

Pranali Kodre

Ruturaj Gaikwad Record: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत (IPL) 49 वा बुधवारी (1 मे) सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात होत आहे. चेपॉक स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने कर्णधार ऋतुराज गायकवाडने शानदार अर्धशतक करत मोठे विक्रम केले आहेत.

त्याने या सामन्यात 48 चेंडूत 62 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 5 चौकार आणि 2 षटकार मारले. त्यामुळे त्याने आयपीएलच्या चालू हंगामात 500 धावांचा टप्पा पार केला. याबरोबरच त्याने आयपीएल 2024 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहलीला मागे टाकत अव्वल क्रमांक पटकावला आहे.

सध्या 1 मे पर्यंत आयपीएल 2024 मध्ये ऋतुराजने 10 सामन्यांत 63.63 च्या सरासरीने 1 शतक आणि 4 अर्धशतकांसह 509 धावा केल्या आहेत.

तसेच विराटच्या नावावर 10 सामन्यांत 71.43 च्या सरासरीने 1 शतक आणि 4 अर्धशतकांसह 500 धावा आहेत. त्यामुळे सध्या हंगामात सर्वाधिक धावा करण्यासाठी देण्यात येणारी ऑरेंज कॅप ऋतुराजकडे आहे.

धोनीचा विक्रमही टाकला मागे

दरम्यान, ऋतुराजने आयपीएलच्या 17 व्या हंगामात 500 धावा पार केल्या असल्याने त्याच्या नावावर चेन्नईचा कर्णधार म्हणून मोठा विक्रम झाला आहे. तो एका आयपीएल हंगामात 500 धावा करणारा चेन्नईचा पहिलाच कर्णधार ठरला आहे.

ऋतुराजने एका आयपीएल हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या चेन्नईच्या कर्णधारांच्या यादीत एमएस धोनीला मागे टाकत अव्वल क्रमांक पटकावला आहे. धोनीने चेन्नईचा कर्णधार म्हणून 2013 च्या आयपीएल हंगामात 461 धावा केल्या होत्या. हा त्याचा आयपीएल कारकिर्दीत धावांच्या बाबतीत सर्वोत्तम हंगामही ठरला होता.

एका आयपीएल हंगामात सर्वाधिक धावा करणारे चेन्नईचे कर्णधार

  • 509 धावा - ऋतुराज गायकवाड, 2024 (10 सामने)*

  • 461 धावा - एमएस धोनी, 2013 (18 सामने)

  • 455 धावा - एमएस धोनी, 2018 (16 सामने)

  • 416 धावा - एमएस धोनी, 2019 (15 सामने)

चेन्नईचे पंजाब समोर 163 धावांचे आव्हान

बुधवारी ऋतुराजच्या अर्धशतकाच्या जोरावर प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 162 धावा केल्या. त्यामुळे आता विजयासाठी पंजाबसमोर 163 धावांचे लक्ष्य आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

MLA Prakash Solanke : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला प्रकाश सोळंके यांचा पाठिंबा; सोशल मीडियावर 'मी येतोय तुम्ही या'चे आवाहन

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

SCROLL FOR NEXT