Chennai Super Kings Defeat Sunrisers Hyderabad Ruturaj Gaikwad Tushar Deshpande Shine IPL 2024  esakal
IPL

Ruturaj Gaikwad CSK vs SRH : ऋतु बहरला, देशपांडेही चमकला; सीएसकेनं बालेकिल्ला परत मिळवला!

अनिरुद्ध संकपाळ

Chennai Super Kings Defeat Sunrisers Hyderabad Ruturaj Gaikwad Tushar Deshpande Shine IPL 2024 : चेन्नई चेपॉकवर अभेद्य होती. मात्र केएल राहुलच्या लखनौनं येऊन सीएसकेचा बालेकिल्ला जिंकला. लखनौच्या आक्रमणानंतर आता हैदराबादचं मोठं आव्हान ऋतुराजसमोर होतं. सीएसकेचा नवखा कर्णधाराला हैदराबादचं अवाढव्य आव्हान परतवून लावत आपला बालेकिल्ला पुन्हा जिंकायचा होता.

समोर हेड, अभिषेक शर्मा, मार्करम, क्लासेन, पॅट कमिन्स, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार यासारखे तगडे योद्धे होते. त्यात नाणेफेक गमावल्यानं सीएसकेच्या सेनेचं काम अजून अवघड झालं होतं.

मात्र मराठमोळा लढवय्या कर्णधार ऋतुराजनं आपल्या संघाचं पुढं होऊन नेतृत्व केलं. तगड्या गोलंदाजीसमोर चेन्नईला म्हणावी तशी चांगली सुरूवात मिळाली नाही. त्यात अजिंक्य रहाणे स्वस्तात बाद झाला. मात्र ऋतुराज खचला नाही. त्यानं डॅरेल मिचलला साथीला घेतलं अन् आधी पॉवर प्ले संपायच्या आत झालेलं नुकसान भरून काढलं.

पॉवर प्लेनंतरही ऋतुराजनं आपली फटकेबाजी सुरू ठेवली. त्याला मिचेलनंही दमदार साथ दिली. या जोडींन तिसऱ्या विकेटसाठी 107 धावांची शतकी भागीदारी रचली. त्यानंतर दांडपट्टा स्पेशलिस्ट शिवम दुबेनं 20 चेंडूत 39 धावा करत हैदराबादला हैराण करून सोडलं. कर्णधार ऋतुराज शंभरीजवळ पोहचला होता. तो जवळपास 200 च्या स्ट्राईक रेटनं धावा करत होता.

मात्र नटराजननं मोक्याच्या क्षणी सीएसकेच्या कर्णधाराला खिंडीत पकडलं अन् अवघ्या 2 धावांनी ऋतुराजचं शतक हुकलं. जरी शतक हुकलं असलं तरी ऋतु बहरला होता अन् सीएसकेने 200 चा आकडा गाठला होता. शेवटच्या षटकात शिवम दुबेनं शेवटचा हात फिरवून घेतला अन् संघाला महत्वाच्या धावा करून दिल्या. धोनीनंही हात धुवून घेत एक चौकार पदरी पाडून घेतला.

आता सीएसकेची खरी परीक्षा सुरू झाली होती. 212 धावा करून जरी अर्धी लढाई जिंकली असली तरी आता हैदराबाद पलटावर करणार होतं. हा पलटवार परतवून लावत बालेकिल्ला वाचवणं गरजेचं होतं. ऋतुराजच्या सेनेतला तुषार देशपांडेनं ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली.

आधी त्यानं हैदराबादचे अव्वल शिलेदार ट्रॅविस हेड, अमोलप्रीत अन् अभिषेक शर्माची शिकार केली. पहिल्याच आक्रमणात तीन तगडे शिलेदार गमावल्यानं हैदराबादला हाबकी भरली. हैदराबादचे मधल्या फळीतील शिलेदार एडिन मार्करम अन् नितीश रेड्डी यांनी पुन्हा चढाई करण्याचा प्रयत्न केला. मात्र सीएसकेच्या कसलेल्या गोलंदाजांच्या माऱ्यासमोर त्यांची आगेकूच मंदावली.

रेंगाळलेल्या मार्करम आणि नितीश रेड्डीला रोखून धरल्यानंतर पथिराना अन् जडेजानं त्यांचा काटा अलगद काढला. पथिरानानं एकहाती सामन्याचा नूर पालटण्यात तरबेज असलेल्या क्लासेनचीही शिकार केली. सीएसकेच्या या गोलंदाजांना फिल्ड प्लेसमेंटची उत्तम साथ लाभली. त्यामुळंच ओल्या मैदानावर परिस्थिती बाजूनं नसतानाही सीएसकेच्या पोरांनी हैदराबादला हैराण केलं.

तुषार, पथिराना अन् जडेजाच्या या शिकारी मोहीमेत आता ठाकूर अन् मुस्तफिजूरही सामील झाले होते. त्यांनी समाद, शाहबाज अहमद यांची शिकार करत आपलाही वाटा उचलला. तुषार देशपांडेनं या शिकारी टोळीचं जबरदस्त नेतृत्व केलं. त्यानं हैदराबादच्या नेत्याला टिपला अन् हैदराबादला पराभवाच्या खाईजवळ नेऊन ठेवलं. मुस्तफिजूरनं उनाडकटची शिकार करत हैदराबादचा कडेलोट केला! सीएसकेनं आपला बालेकिल्ला पुन्हा मिळवला!

(IPL 2024 Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT