Ruturaj Gaikwad - Rishabh Pant | DC vs CSK | IPL 2024  X/IPL
IPL

IPL 2024: पंतकडून गोलंदाजांचे कौतुक, तर ऋतुराजने सांगितलं कुठे झाली चूक; DC vs CSK मॅचनंतर काय म्हणाले कर्णधार?

IPL 2024, DC vs CSK: दिल्ली कॅपिटल्सकडून चेन्नई सुपर किंग्सला आयपीएल 2024 च्या 13 व्या सामन्यात पराभवाचा धक्का बसला. या सामन्यानंतर दोन्ही संघाचे कर्णधार काय म्हणाले, जाणून घ्या.

Pranali Kodre

IPL 2024, DC vs CSK: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात रविवारी (31 मार्च) 13 वा सामना झाला. विशाखापट्टणमला झालेल्या या सामन्यात दिल्लीने चेन्नईला 20 धावांनी पराभूत केलं. चेन्नईचा हा 17 व्या हंगामातील पहिलाच पराभव ठरला, तर दिल्लीचा हा पहिलाच विजय ठरला.

या सामन्यात दिल्लीने चेन्नईसमोर 192 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईला 20 षटकात 6 बाद 171 धावाच करता आल्या.

चेन्नईकडून अजिंक्य रहाणेने 30 चेंडूत 45 धावांची खेळी केली. त्याचबरोबर डॅरिल मिचेलने 34 धावांची, एमएस धोनीने नाबाद 37 धावांची तर जडेजाने नाबाद 21 धावांची खेळी केल्या. दिल्लीकडून मुकेश कुमारने 3 विकेट्स घेतल्या.

तत्पूर्वी, दिल्लीकडून डेव्हिड वॉर्नरही 35 चेंडूत 52 धावांची खेळी केली, तसेच पृथ्वी शॉ याने 43 धावांची खेळी केली. त्याचबरोबर कर्णधार ऋषभ पंतने 34 चेंडूत 51 धावांची खेळी केली. चेन्नईकडून गोलंदाजीत मथिशा पाथिरानाने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

या सामन्यात विजय मिळवल्यानंतर दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत म्हणाला, 'गोलंदाजांनी आज शानदार कामगिरी केली. आम्ही चूकांमधून शिकलो. पृथ्वी शॉ गेले दोन आठवडे मेहनत करत होता. आम्ही विचार केला की त्याला संधी देण्याची हिच वेळ आहे आणि त्यानेही या संधीचा फायदा घेतला.

आम्ही प्रत्येक सामन्यानुसार विचार करणार आहोत. जर मुकेशने शेवटीही गोलंदाजी केली, तर चांगलेच आहे. क्रिकेटपटू म्हणून मला माझे 100 टक्के योगदान द्यायचे आहे. मी सुरुवातीला थोडा वेळ घेतला कारण मी गेल्या दीड वर्षात फार क्रिकेट खेळलो नाही. काहीही झाले तरी मैदानात पुनरागमन करणे महत्त्वाचे आहे, याबाबत मला नेहमीच आत्मविश्वास होता.'

तसेच चेन्नईचा कर्णधार ऋतुराजच्या नेतृत्वात हा पहिला पराभव होता. पराभवानंतर ऋतुराज म्हणाला, 'गोलंदाजांनी पॉवरप्लेनंतर ज्याप्रकारे पुनरागमन केले त्याबद्दल मी आनंदी आहे. त्यांनी 191 धावांवर रोखणे हा चांगला प्रयत्न होता. पहिल्या डावात खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली होती. दुसऱ्या डावात चेंडूची ज्यादाची हालचाल होत होती आणि उसळीही मिळत होती.'

याशिवाय ऋतुराजने या सामन्यात चेन्नईकडून कोणती चूक झाली हेही सांगितले. तो म्हणाला, 'आम्ही पहिल्या तीन षटकात फार धावा करू शकलो नाही आणि तोच सामन्यातला फरक राहिला.'

'वेगवान गोलंदाजीला मदत मिळत होती आणि आम्हाला चांगली कामगिरी करता आली नाही. आम्ही सुरुवातीपासून मागे पडलो. आम्हाला रनरेट कमी करण्यासाठी असे कोणतेही षटक मिळाले नाही, ज्यात आम्ही मोठ्या धावा करू.'

दिल्लीकडून सलामीला वॉर्नर आणि शॉ यांनी पॉवरप्लेच्या 6 षटकांमध्ये 62 धावा केल्या होत्या. या चांगल्या सुरुवातीचा फायदा दिल्लीला मोठी धावसंख्या उभारण्यात झाला.

याबद्दल बोलताना ऋतुराज म्हणाला, 'पॉवरप्लेमध्ये आणखी एका गोलंदाजाला संधी देण्याचा विचार केला नाही, कारण दीपक चाहर नेहमीच सुरुवातीच्या 3 षटकात गोलंदाजी करतो. तरी पॉवरप्लेमधील पहिले चार षटके चांगली होती, पण नंतरची दोन षटके महागडी ठरली.'

'सुरुवातीच्या दोन चांगल्या सामन्यांनंतर तिसऱ्या सामन्यातही चांगली कामगिरी होईल ही आपली अपेक्षा असते, पण तरी काळजी करण्याची फार गरज नाही. एक-दोन शॉट्स चांगले मारले असते आणि क्षेत्ररक्षणात जर आम्ही एक-दोन बाऊंड्री थांबवल्या असत्या, तरी फरक पडला असता.'

दरम्यान, चेन्नईचा पुढचा सामना 5 एप्रिलला सनरायझर्स हैदराबादविरुद्ध होणार आहे. तसेच दिल्लीचा पुढचा सामना 3 एप्रिलला कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: इंटरनॅशनल अशोक खरात! ९ महिने, ९७ गुन्हे, ६१ महिलांवर अत्याचार... ऑस्ट्रेलियात भारतीय वंशांच्या व्यक्तीचं कांड उघड

Narayangaon Protest: मिलिंद एकबोटे यांच्या मुस्लिमविरोधी वक्तव्याचा नारायणगावात तीव्र निषेध, कायदेशीर कारवाईची मागणी

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT