Sachin Tendulkar T20 is Cruel Game
Sachin Tendulkar T20 is Cruel Game esakal
IPL

मुंबईच्या मेंटॉरचा सल्ला; टी 20 'क्रूर' खेळ, महत्वाच्या क्षणांवर हवे नियंत्रण

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) मेंटॉर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) टी 20 क्रिकेट (T20 Cricket) हे खूप क्रूर खेळ (Cruel Game) आहे. इथे छोटी चूक देखील मोठा फरक निर्माण करू शकते. पाच वेळा आयपीएल जिंकणाऱ्या मुंबईसाठी सचिनने एक सल्ला दिला आहे. सामन्याचे जे महत्वाचे क्षण असतात त्यावर नियंत्रण मिळवले, तेथे आपला खेळ उंचावला तर मुंबईला पराभवाची मालिका खंडित करता येईल असे मत त्याने व्यक्त केले आहे.

चेन्नई सुपर किंग्जने (Chennai Super Kings) मुंबईचा 3 विकेट्स राखून पराभव केला. चेन्नईला शेवटच्या षटकात विजयासाठी 17 धावांची गरज होती. त्यावेळी महेंद्रसिंह धोनीने शेवटच्या चार चेंडूत 6, 4, 2, 4 अशा 16 धावा चोपून चेन्नईला विजय मिळवून दिला. मुंबईचा यंदाच्या आयपीएलमधील हा सलग सातवा पराभव होता. या पराभवानंतर मुंबई इंडियन्सचा मेंटॉर सचिन तेंडुलकरने प्रतिक्रिया दिली.

सचिन तेंडुलकर म्हणाला, 'सर्वात प्रथम या फॉरमॅटमध्ये असा कोणताच संघ नाही ज्याने हंगामात मुंबई इंडियन्स सारखा अनुभव घेतलेला नाही. सर्वांवर अशी परिस्थिती आली आहे.' सचिन पुढे म्हणाला की, 'हा फॉरमॅट खूप क्रूर आहे. सामन्यातील महत्वाच्या क्षणांमध्ये परिस्थिती तुमच्या हातून निसटली तर होत्याचे नव्हते होते. तुम्ही सामना दोन ते तीन धावांनी गमावू शकता कधी कधी शेवटच्या चेंडूवर देखील सामना हरण्याची नामुष्की येऊ शकते. याच सामन्याच्या नाजूक क्षणांवर नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे. तेथे जिंकलात तर सामना जिंकता येईल. मुंबईच्या बाबतीच येथेच गफलत होत आहे.'

सचिन म्हणाला की, मला इथे अजून एक मुद्दा मांडायचायं, संघातील युवा खेळाडू सेटल होण्यासाठी काही वेळ लागेल. जरी यंदाचा हंगाम आमच्यासाठी खराब गेला असला तरी खेळाडूंनी मैदानावर खूप कष्ट घेतले आहे. मुंबई इंडियन्सचा हा नवा आणि तरूण संघ आहे. त्यांना संघात स्थीर होण्यासाठी काही वेळ लागेल. मात्र या परिस्थितीतून तुम्हाला जावेच लागणार आहे. अशावेळी तुम्ही एकसंघ रहा आणि समस्यांवर उपाय शोधा.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'7 दिवस पत्नी अन् 7 दिवस प्रेयसीसोबत राहतो'; कराराच्या आधारे कोर्टाने केली आरोपीची सुटका

Sanju Samson Fined : अंपायरशी वाद घालणे आले अंगलट... BCCI ची संजू सॅमसनवर मोठी कारवाई; काय आहे संपूर्ण प्रकरण

Latest Marathi News Live Update : नंदुरबार येथे काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची उद्या सभा

Share Market Opening: गुंतवणूकदार चिंतेत! शेअर बाजारात पुन्हा घसरण; 'या' शेअर्सचे मोठे नुकसान

Nagpur Crime News : प्रेयसीने बोलणे बंद केल्याने पेटविले दुकान; आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT