Punjab Kings Defeat Delhi Capitals In IPL 2024 esakal
IPL

PBKS vs DC : पंतचं पुनरागमन... इम्पॅक्टफुल अभिषेक... खलीलचं धक्कातंत्र मात्र सॅम करन पडला सर्वांवर भारी

अनिरुद्ध संकपाळ

Punjab Kings Defeat Delhi Capitals In IPL 2024 : 15 महिन्यांचा कठिण काळ... रूग्णवाहिका... स्ट्रेचर... ऑपरेशन थिएटर अन् कुबड्या असा निराश करणारा प्रवास करत अखेर आपल्या सर्वांचा लाडका पंत मैदानावर परतला!

दिल्लीच्या संघानं देखील दमदार सुरूवात करत कॅप्टनला मोठा दिलासा दिला. मात्र चंदिगडच्या नव्या महाराजा यादवेंद्र सिंग स्टेडियमच्या खेळपट्टीवर पंजाबच्या वेगवान गोलंदाजांनी दिल्लीच्या चौफेर उधळलेल्या घोड्यांना आवर घालण्यास सुरूवात केली.

अर्शदीप, हर्षल पटेल अन् रबाडाने टॉप ऑर्डर उडवल्यानंतर ज्या खेळाडूची 453 दिवस प्रतिक्षा होती तो खेळाडू म्हणजे ऋषभ पंत! मैदानात पंत दाखल होताच प्रेक्षकांनी स्टँडिग ओवेशन दिलं. ही मानवंदाना स्विकारून पंतने आपली कमबॅक इनिंग खेळण्यास सुरूवात केली. अडखळती सुरूवात करत पंत कसाबसा 18 धावांवर पोहचला.

मात्र हर्षल पटेलच्या एका बाऊन्सरनं त्याला चकवलं. पंतची 2 चौकारांसह केलेली 18 धावांची खेळी संपुष्टात आली. पंत बाद झाला त्यावेळी दिल्लीचं रनरेट चांगलं होतं. मात्र डाव गडगडला अन् अवस्था 17 षटकात 7 बाद 138 धावा अशी झाली.

दिल्लीचा पराभव जवळपास निश्चित झाला असं वाटत असतानाच इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानात आलेल्या बंगलाच्या किरकोळ देहयष्टीच्या अभिषेक पोरेलने पंजाबच्या भ्रमाचा भोपळा फोडला. त्यानं शेवटच्या तीन षटकात होत्याचं नव्हतं केलं.

10 चेंडूत नाबाद 32 धावा करणाऱ्या पोरेलने पंजाबचा दिवसातील स्टार गोलंदाज हर्षल पटेलच्या शेवटच्या षटकात तीन चौकार आणि दोन षटकार ठोकत 25 धावा वसूल केल्या. डावखुऱ्या पोरेलने 2021 च्या हंगामातील आठवण ताजी केली अन् हर्षल पटेलच्या जखमेवरची खपली काढली. जडेजाने हर्षलच्या शेवटच्या षटकात 37 धावा ठोकल्या होत्या.

दिल्लीनं शेवटच्या तीन षटकात सामन्यात जोरदार कमबॅक केलं खंर मात्र पंजाबसमोर ठेवलेलं 175 धावांचं आव्हान पुरेसं नव्हतं. पंजाबनं पहिल्या 10 षटकात जवळपास 80 धावांचा टप्पा पार केला होता.

दिल्लानंही पंजाबला धक्के देत सामन्यावर पुन्हा पकड निर्माण करण्यासाठी जोर लावला. कुलदीप यादवनं प्रभसिमरनला 26 तर जितेश शर्माला 9 धावांवर बाद केलं. पंजाबची अवस्था 2 बाद 84 धावांवरून 4 बाद 100 धावा झाली.

पंजाबसाठी दिल्ली सर करणं अभी दूर हैं असं वाटत होतं. मात्र पंतचे पुनरागमन विजयाने साजरं करण्याचा मनसुबा सॅम करनने उधळून लावला. त्यानं 48 चेंडूत 63 धावांची तडाखेबाज खेळी करत पंजाबला विजयाच्या जवळ आणलं. त्याने लिम लिव्हिंगस्टोनसोबत 67 धावांची भागीदारी रचली.

मात्र पहिल्या दोन षटकात सपाटून मार खालेल्या खलीलनं पंजाबचा बीपी वाढवला. त्यानं विजयासाठी 10 चेंडूत 8 धावांची गरज असताना सॅम करनची दांडी गुल केली. पुढच्याच चेंडूवर शशांक सिंहला देखील माघारी धाडलं. याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर हरप्रीत ब्रार देखील खलीलची शिकार झाला असता मात्र डेव्हिड वॉर्नरने सोपा कॅच सोडला अन् दिल्लीने खेचून आणलेला सामना गमावला.

शेवटच्या षटकात 6 धावांची गरज असताना सुमितने दोन वाईड बॉल टाकत पंजाबच्या विजयाला हातभार लावला. अखेर लिव्हिंगस्टोनने षटकार मारत पंजाबचा विजय पूर्ण केला.

(IPL Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: दुसरी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधींनी काय सिद्ध केलं? निवडणूक आयोगाला दिलेला अल्टिमेटम नेमका काय आहे?

Pune Encroachment : शहरातील हजारो चौरस फुटावरील अतिक्रमण हटवले

Teachers Award : १०९ शिक्षकांना राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर; पुणे जिल्ह्यातील सहा शिक्षकांचा समावेश

Ayush Komkar Case : आयुषच्या खूनापुर्वी आरोपींची एकत्रित बैठक; वनराज आंदेकरची पत्नी अटकेत, पुरवणी जबाबात सोनालीचा सहभाग असल्याची माहिती

Latest Maharashtra News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT