Ashwin-Sanjay-Manjrekar 
IPL

अश्विनसारख्या माणसाला कधीच संघात घेणार नाही- संजय मांजरेकर

विराज भागवत

वाचा, मांजरेकर यांच्या या विधानामागचं कारण...

IPL 2021 DC vs KKR: शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात कोलकाताने दिल्लीच्या संघावर ३ गडी राखून विजय मिळवला. दिल्लीचा प्रवास पराभवासह संपुष्टात आला तर कोलकाताने चेन्नईविरूद्ध फायनलचं तिकीट मिळवलं. दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना १३५ धावा केल्या होत्या. कोलकाताने हे आव्हाना शेवटच्या षटकात पूर्ण केले. सामन्यात अश्विनने शेवटचे षटक टाकताना दोन बळी टिपले पण एका चुकीच्या चेंडूवर षटकार खात त्याच्या संघाला पराभूत व्हावे लागले. त्यानंतर, अश्विनसारख्या माणसाला संघात अजिबात स्थान देणार नाही, असं रोखठोक मत मुंबईकर माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी व्यक्त केलं.

"अश्विनबद्दल आपण गेली अनेक वर्षे चर्चा करत आहोत. अश्विन टी२० मध्ये फासरा प्रभावी गोलंदाज नाही हे माझं स्पष्ट मत आहे. तुम्ही अश्विनला काही सल्ला दिलात तरी तो बदलणार नाही. कारण गेल्या ५-७ वर्षात तो त्याच त्याच गोष्टी करताना दिसत आहे. कसोटी सामन्यांमध्ये अश्विनवर अवलंबून राहणं समजू शकतो पण टी२० क्रिकेटमध्ये अश्विन हा फारसा चांगला पर्याय नाही. गेल्या पाच वर्षात अश्विन एकसारखीच गोलंदाजी करताना दिसतोय. त्यामुळे मला जर फिरकीला मदत करणारं पिच मिळालं तर मी वरूण चक्रवर्ती, सुनील नारायण किंवा युजवेंद्र चहलला संघात घेईन. पण अश्विनसारख्या माणसाला संघात अजिबात घेणार नाही", असं सडेतोड मत अश्विनने व्यक्त केलं.

दरम्यान, दिल्लीविरूद्धच्या सामन्यात कोलकाताकडून सलामीवीर व्यंकटेश अय्यर आणि शुबमन गिल या दोघांनीही दमदार कामगिरी केली. व्यंकटेश अय्यरने ५५ धावांची खेळी केली. त्यात ४ चौकार आणि ३ षटकार समाविष्ट होते. गिलला अर्धशतकाने हुलकावणी दिली. त्याने ४६ चेंडूत ४६ धावा केल्या. या दोघांच्या विकेटनंतर सामना विचित्र प्रकारे फिरला. नितीश राणा १३ धावांवर बाद झाल्यानंतर दिनेश कार्तिक, इयॉन मॉर्गन, शाकीब अल हसन आणि सुनील नारायण हे चौघे भोपळाही फोडू शकले नाहीत. पण अखेर राहुल त्रिपाठीने मोक्याच्या क्षणी षटकार मारून संघाला विजय मिळवून दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyclone Montha: चक्रीवादळ 'मोंथा'मुळे देशभरातील हवामान बदलणार ; पुढील पाच दिवसांत 'या' राज्यांना पावसाचा इशारा!

मोठी बातमी! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; उमेदवारांना करता येईल २९ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत ‘या’ वेबसाईटवर अर्ज; एका पदासाठी एकाच अर्जाची अट

Montha Cyclone update : 'मोंथा' चक्रीवादळाचं थैमान सुरू! आंध्र प्रदेशात किनारपट्टी भागाला जोरदार तडाखा

Fake Acid Attack Case : धक्कादायक! दिल्लीत विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ल्याचं प्रकरण बनावट असल्याचे निष्पन्न!

दिवाळीपूर्वी मदत देण्याची घोषणा, तरी..! निम्मा सोलापूर जिल्हा अतिवृष्टीच्या मदतीपासून दूर; 3.95 लाख शेतकऱ्यांना मिळाली नाही भरपाई, तालुकानिहाय संख्या...

SCROLL FOR NEXT