Sanju Samson IPL Video  esakal
IPL

Sanju Samson IPL Video : असं फक्त संजूच करू शकतो! सेल्फी घेताना चाहत्याच्या फोन वाजला अन्...

अनिरुद्ध संकपाळ

Sanju Samson IPL Video : राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनचा फॅन बेस खूप मोठा आहे. संजूच्या बाबतीत जरा काही वर खाली झाले की त्याचे फॅन्स सोशल मीडियावर ट्रेंडिंगचे वादळच उठवतात. संजू देखील आपल्या चाहत्यांबद्दल आदरच ठेवत असतो. संजूने कधी आपल्या चाहत्यांशी गैरवर्तन केल्याचे ऐकण्यात येत नाही. संजू आपल्या चाहत्यांसोबत सहज मिसळतो. याचा प्रत्यक्ष अनुवभ यंदाच्या आयपीएल हंगामातील एका सामन्यादरम्यान आला.

संजू सॅमसन सामना झाल्यावर स्टेडियममधील आपल्या चाहत्यांना सेल्फी आणि ऑटोग्राफ देत होता. यावेळी एका चाहत्याने सेल्फी काढण्यासाठी संजूकडे आपला मोबाईल फोन दिला. मात्र सेल्फी काढत असतानाच चाहत्याच्या फोनवर कॉल आला. यानंतर संजूने त्या फॅनच्या विनंतीवर तो फोन उचलला आणि उत्तर दिले.

यावेळी चाहत्याने फोन केलेल्या मित्राला सांगितले की संजू सॅमसन बोलतोय. फॅनने संजूला हॅलो म्हणण्याची विनंती केली. संजूने देखील या विनंतीला माग देत त्या मित्राला हा भैया क्या हाल है! असे विचारले यानंतर उपस्थित चाहत्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. हा व्हिडिओ राजस्थान रॉयल्सने आपल्या ट्विटवरून शेअर केला.

राजस्थान रॉयल्सला पाठोपाठच्या दोन सामन्यात पराभव सहन करावा लागला आहे. ते आता चेन्नई सुपर किंग्जविरूद्धचा घरच्या मैदानावर होणाऱ्या सामना जिंकून आपली गाडी पुन्हा विजयीपथावर आणण्यासाठी प्रयत्नशील असतील. मात्र त्यांचा मुकाबला हा धोनीच्या नेतृत्वातील सलग तीन सामन्यात विजय मिळवलेल्या संघाशी होणार आहे. आजचा सामना हा चेन्नईची तगडी टॉप ऑर्डर बॅटिंग लाईन अप आणि राजस्थानची जागतिक दर्जाची फिरकी यामध्ये होणार आहे.

(Sports Latest News)

हेही वाचा : Types of Vedas: वेदांचे प्रकार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी मंडपात वीज कनेक्शन हवंय? BEST च्या ११ अटी पूर्ण करा, ELCB रिपोर्टही द्यावा लागणार, नवे नियम काय?

MS DHONI CSK STAKE CONTROVERSY: धोनीला CSKमध्ये २५ टक्के हिस्सा हवा होता? दाव्याने खळबळ, आकाश चोप्रांनी सांगितलं नेमकं सत्य

‘मराठी डाऊनमार्केट भाषा आहे असं सांगण्यात आलं’ चिन्मयी सुमीत यांनी सांगितला मुंबईतील जीमचा धक्कादायक अनुभव

सणासुदीत अन्नसुरक्षेवर FDAची नजर! शाळा, अंगणवाड्यांसह सेंट्रल किचनची तपासणी; नवे आदेश जारी करणार

Marathi News Live Updates : नेपाळमधील अचानक आलेल्या पुरामुळे मृतांची संख्या २५८ वर पोहोचली

SCROLL FOR NEXT