Sanju Samson | Cricket News in Marathi sakal
IPL

IPL 2023 Sanju Samson: संजू भाऊने तोडला धोनी तात्याचा रेकॉर्ड अन् BCCI टेन्शन मध्ये!

IPL 2023 Sanju Samson : संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सला बुधवारी एका रोमहर्षक सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले.

Kiran Mahanavar

IPL 2023 Sanju Samson : संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सला बुधवारी एका रोमहर्षक सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. गुवाहाटी येथील बारसापारा येथे झालेल्या सामन्यात पंजाब किंग्जने राजस्थानचा पाच धावांनी पराभव केला.

राजस्थान भलेही हा सामना हरला असेल पण त्याचा कर्णधार संजू सॅमसनसाठी तो खूप खास होता. या सामन्यासह त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आणि महेंद्रसिंग धोनीला मागे टाकले. त्याचबरोबर तो राजस्थान रॉयल्सचा सर्वात यशस्वी फलंदाज बनला आहे.

पंजाब किंग्जविरुद्ध संजू सॅमसनने 25 चेंडूत 5 चौकार आणि एका षटकारासह 42 धावांची धडाकेबाज खेळी केली. त्याची खेळी संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही, पण तो राजस्थानसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे.

त्याने आपल्या संघासाठी 118 सामने खेळले ज्यात त्याने 30.46 च्या सरासरीने 3,138 धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 18 अर्धशतकेही झळकली. त्याने या संघासाठी 3098 धावा करणाऱ्या अजिंक्य रहाणेला मागे सोडले.

इतकेच नाही तर या खेळीसह कर्णधार म्हणून सर्वात जलद 1000 धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत संजू सॅमसन पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. सॅमसनने 33 डावात हा पराक्रम केला आहे.

दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने कर्णधार म्हणून 37 डावांत 1000 धावा केल्या असून तो 8व्या स्थानावर आहे. केएल राहुल सर्वात पुढे आहे, त्याने 22 डावात हे काम केले आहे. संजू सॅमसन या सीझनमध्ये खूप चर्चेत दिसत आहे. सॅमसनने पहिल्या सामन्यातही 54 धावांची खेळी केली होती.

संजू सॅमसनच्या बॅटमधून ज्या प्रकारे धावांचा वर्षाव होत आहे, त्यामुळे बीसीसीआयचे टेन्शन वाढले आहे. आपल्या फलंदाजीच्या जोरावर सॅमसन यावर्षी भारतात होणाऱ्या विश्वचषक संघासाठी आपला दावा मांडत आहे.

त्याच्याकडे दुर्लक्ष करणे बीसीसीआयसाठी सोपे जाणार नाही. यष्टिरक्षक फलंदाज म्हणून तो संघासाठी चांगला पर्याय आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

SCROLL FOR NEXT