sanju Samson Post Controversy esakal
IPL

कॅप्टन संजूचा तो फोटो शेअर करणं आलं अंगलट; RRची सोशल टीम हटवली

सकाळ डिजिटल टीम

राजस्थान रॉयल्सचा संघ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालतोय. राजस्थान रॉयल्सच्या (Rajasthan Royals) सोशल मीडिया अकाऊंवरून अनेक मजेदार, खेळाडूंची मस्करी करणाऱ्या पोस्ट शेअर होत आहेत. मात्र आरआरच्या सोशल मीडिया टीमला कर्णधाराची खेचणे महागात पडल्याचे दिसते.

राजस्थान रॉयल्सच्या सोशल मीडिया टीमने कर्णधार संजू सॅमसनचा (Sanju Samson) एक मॉर्फ केलेला फोटो सोशल मीडियावर टाकला. मात्र संजू सॅमसनने याच्यावर आक्षेप घेतल्यानंतर हा फोटो सोशल मीडिया हँडलवरून हटवण्यात आला. आरआरच्या सोशल मीडिया टीमच्या (Social Media) या आगाऊपणावर संजू भडकला आणि त्याने याबाबत ट्विटरवरून जाहीर नाराजी व्यक्त केली.

सॅमसन आपल्या पोस्टमध्ये म्हणतो की, 'मित्राने असला अगाऊपणा करणे ठीक आहे. मात्र संघाने व्यावसायिकता दाखवली पाहिजे.' सुरूवातीला संजू सॅमसनचे हे ट्विट आल्यानंतर ही एक प्रकारची सोशल मीडियावरील मस्करी आहे का असे वाटू लागले होते. मात्र संजू सॅमसनच्या ट्विटनंतर फ्रेंचायजीने देखील सॅमसनचा फोटो शेअर केलेली पोस्ट हटवली आणि खुलासा केला. त्यानंतर हे गंभीर प्रकरण होते हे स्पष्ट झाले.

संजू सॅमसनच्या या फोटोवरूनच वाद झाला. नंतर ही पोस्ट डिलीट करण्यात आली.

सॅमसनने नाराजी व्यक्त केल्यानंतर फ्रेंचायजीने पोस्ट करत आपण आता सोशल मीडियाच्या रणनितीत बदल करण्याबाबत विचार करत आहोत. लवकरच सोशल मीडियासाठी नवी टीम नियुक्त केली जाईल असेही या पोस्टमध्ये सांगण्यात आले आहे.

'आजच्या घटनेनंतर आम्ही आमच्या सोशल मीडियावरील दृष्टीकोणात आणि टीममध्येही बदल करणार आहोत. संघ आपल्या पहिल्या लढतीसाठी तयार आहे. आम्हाला हा आयपीएल हंगाम आहे या गोष्टीची चांगलीच जाणीव आहे. प्रत्येक फॅनला सर्व अपडेट हव्या असतात. आम्ही हे लवकरच सुधारू.' राजस्थान रॉयल्सचा हंगामातील पहिला सामना हा मंगळवारी सनरायजर्स हैदराबाद बरोबर होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

kapil sharma : कपिल शर्माच्या कॅनाडातील कॅफेवर पुन्हा गोळीबार....लॉरेंस बिश्नोई गँगने घेतली जबाबदारी...पुढचा हल्ला मुंबईत करण्याचीही धमकी

Narali Pournima and Gauri Visarjan Holiday : राज्य सरकारने नारळीपौर्णिमा अन् ज्येष्ठगौरी विसर्जनानिमित्त स्थानिक सुट्टी केली जाहीर, मात्र...

Sanju Samson ने राजस्थानची साथ सोडल्यास कॅप्टन कोण?

China criticized USA : भारतावर 'टॅरिफ बॉम्ब' फोडणाऱ्या अमेरिकेला आता चीननेही सुनावलं!

Latest Maharashtra News Updates: मनोज जरांगे पाटील यांची दिली नांदणी मठाला भेट

SCROLL FOR NEXT