IPL 2024 SRH vs RR Sanju Samson sakal
IPL

SRH vs RR Sanju Samson : '....आणि आम्ही इथेच मॅच हरलो’, लाजिरवाण्या पराभवानंतर कर्णधार संजू सॅमसनचे मोठं वक्तव्य

Sanju Samson on Rajasthan Royals Defeat : आयपीएल 2024 च्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात राजस्थान रॉयल्सला पराभवाला सामोरे जावे लागले आणि यासह त्यांचा स्पर्धेतील प्रवासही संपुष्टात आला.

Kiran Mahanavar

Sanju Samson on Rajasthan Royals Defeat : आयपीएल 2024 च्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात राजस्थान रॉयल्सला पराभवाला सामोरे जावे लागले आणि यासह त्यांचा स्पर्धेतील प्रवासही संपुष्टात आला. राजस्थान रॉयल्सच्या या पराभवानंतर त्यांचा कर्णधार संजू सॅमसनने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. संघाने कुठे चुका केल्या, त्यामुळे राजस्थानला पराभवाला सामोरे जावे लागले हे त्याने सांगितले.

आयपीएल 2024 चा दुसरा क्वालिफायर सामना सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला गेला. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सचा ३६ धावांनी पराभव केला.

प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादने निर्धारित 20 षटकात 9 गडी गमावून 175 धावा केल्या आणि प्रत्युत्तरात राजस्थान संघ 7 गडी गमावून 139 धावाच करू शकला.

या मोठ्या पराभवामुळे आता राजस्थान रॉयल्सचे ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्नही भंगले असून ते स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. दुसरीकडे, सनरायझर्स संघाने अंतिम फेरीत धडक मारली आहे.

राजस्थानच्या या पराभवामुळे संघाचा कर्णधार संजू सॅमसन खूपच नाराज दिसत होता. सामन्यानंतर प्रतिक्रिया देताना तो म्हणाला की, हा मोठा सामना होता. पहिल्या डावात आम्ही ज्याप्रकारे गोलंदाजी केली त्यामुळे मला खूप आनंद झाला. मात्र, फलंदाजी करताना त्यांच्या फिरकीपटूंसमोर आम्ही फसलो. आणि इथेच आम्ही मॅच हरलो. दुसऱ्या डावात विकेटही वेगळ्या पद्धतीने खेळत होती. चेंडू थोडासा वळत होता. त्यांनी मधल्या षटकांमध्ये फिरकीपटूंचा चांगला वापर केला.

आयपीएल 2024 चा अंतिम सामना 26 मे रोजी कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT