Sanju Samson Wicket Controversy DC vs RR sakal
IPL

Sanju Samson Wicket Controversy : संजू सॅमसन OUT की NOT OUT? कॅचवरून पेटला वाद; सामन्यादरम्यान मैदानात राडा

Sanju Samson Wicket Controversy DC vs RR : मंगळवारी दिल्लीत राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेल्या सामन्यात आणखी एक वाद समोर आला. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनच्या विकेटवर बराच गदारोळ झाला.

Kiran Mahanavar

Sanju Samson Wicket Controversy DC vs RR : आयपीएलमध्ये एकापाठोपाठ एक अनेक वाद पाहिला मिळत आहेत. मंगळवारी दिल्लीत राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेल्या सामन्यात आणखी एक वाद समोर आला. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनच्या विकेटवर बराच गदारोळ झाला. ही संपूर्ण घटना १६व्या षटकात घडली.

खरंतर, 222 धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेला राजस्थान रॉयल्स संघ 15 व्या षटकापर्यंत सामन्यात होता. संजू सॅमसन 45 चेंडूत 8 चौकार आणि 6 षटकारांसह 86 धावा करून खेळत होता. मुकेश कुमारच्या 16 व्या षटकातील चौथ्या चेंडूवर संजूने लाँग ऑनच्या दिशेने एक कडक शॉट खेळला. पण बाऊंड्री लाइनवर शाई होपने कॅच घेतला.

थर्ड अंपायरने पुन्हा पुन्हा रिव्ह्यू पाहिला. हे पाहून तिसऱ्या पंचाने निर्णय घेतला की शाई होपने कॅच घेताना त्याचा तोल सांभाळला होता. त्याचा पाय सीमेला लागला नाही. मात्र, शाईच्या पायाने सीमारेषेला स्पर्श केल्याचे संजूचे मत होते. अशा स्थितीत त्याने पंचांशी बोलण्यास सुरुवात केली. याविरोधात संजूने फेरविचार करण्याचे आवाहनही केले. मात्र, त्यांची मागणी मान्य झाली नाही.

यावर कॉमेंट्री बॉक्समध्येही आश्चर्य व्यक्त करण्यात आले. समालोचकांनी सांगितले की अंपायरने कोणताही निर्णय घेतला असला तरी त्याने त्याचे योग्य पुनरावलोकन केले नाही. सोशल मीडियावरही या निर्णयाची जोरदार चर्चा सुरू आहे.

संजू आऊट झाल्यानंतर राजस्थान रॉयल्सच्या आशाही पल्लवित झाल्या. हा सामना संघाने 20 धावांनी गमावला. संजूनंतर शुभम दुबे, डोनोवन फरेरा, रविचंद्रन अश्विन आणि रोवमन पॉवेलही आऊट झाले. रॉयल्स संघाला 20 षटकात केवळ 201 धावा करता आल्या. संजू सॅमसनच्या या विकेटने समालोचकांनाही आश्चर्य वाटले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

लग्न न करताच ४० व्या वर्षी जुळ्या मुलांची आई होणार अभिनेत्री; म्हणाली, 'आपल्याकडे एकटी स्त्री...

SCROLL FOR NEXT