Shoaib Akhtar Criticize Chennai Super Kings Management  esakal
IPL

शोएब अख्तरने CSK च्या टीम मॅनेजमेंटला फटकारले

'मला असे वाटते की चेन्नईची मॅनेजमेंट या निर्णयाबाबत गंभीर नव्हती.'

अनिरुद्ध संकपाळ

IPL 2022 : यंदाचा आयपीएल हंगाम चेन्नई सुपर किंग्जसाठी (Chennai Super Kings) चांगला गेला नाही. मुंबई विरूद्धचा सामना 5 विकेट्सनी गमावल्यानंतर चेन्नई प्ले ऑफच्या शर्यतीतून देखील बाहेर पडली आहे. चेन्नईला आधी दुखापतींचे ग्रहण लागले, त्यानंतर अचानक नेतृत्व बदलामुळे चाहत्यांना धक्का बसला. पाठोपाठ गतविजेत्या चेन्नईने सलग चार सामने गमावले आणि आता प्ले ऑफची आशा देखील मावळली. चेन्नईच्या हंगामातील खराब कामगिरीनंतर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) देखील प्रतिक्रिया दिली.

स्पोर्ट्सकीडाला दिलेल्या मुलाखतीत शोएब अख्तर म्हणाला की, चेन्नईने रविंद्र जडेजाला (Ravindra Jadeja) का कर्णधार केले हे समजले नाही. चेन्नईच्या टीम मॅनेजमेंटचा हा निर्णय माझ्या डोक्यावरून गेला. मला असे वाटते की चेन्नईची मॅनेजमेंट या निर्णयाबाबत फारशी गंभीर नव्हती.

शोएब अख्तरने महेंद्रसिंह धोनीच्या (Mahendra Singh Dhoni) भविष्यावर देखील आपले मत व्यक्त केले. तो म्हणाला की, 'चेन्नईची मॅनेजमेंट या हंगामात गंभीर दिसत नाहये. धोनी गेल्यानंतर चेन्नईकडे काहीही शिल्लक राहणार नाही. आता त्यांनी अचानक जडेजाला कॅप्टन्सी का दिली हे तेच सांगू शकतील. पुढच्या हंगामात चेन्नईला एका स्पष्ट विचाराने उतरावे लागणार आहे. त्यांना ज्या खेळाडूंची गरज आहे त्यांना रिटेन करणे गरजेचे आहे. जर धोनी मेटॉरच्या रूपात येणार असेल तर हा योग्य निर्णय असेल. जर धोनी पुढचा सिजन खेळणार असेल तर ही गोष्ट देखील चांगली आहे. मात्र जर धोनी मेंटॉर किंवा मुख्य प्रशिक्षकाची भुमिका बजावत असेल तर ती चेन्नईसाठी तो चांगला निर्णय असेल.'

चेन्नई सुपर किंग्जचे यंदाच्या हंगामातील आता दोन सामने शिल्लक आहेत. सीएसके आता गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्याविरूद्ध सामना खेळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

France Poland Defense: पोलंडमध्ये फ्रान्सची लढाऊ विमाने तैनात

Navaratri 2025: यंदा नवरात्रीत क्लासी ‘स्टाइल स्टेटमेंट’ महिलांना खुणावताहेत वेगवेगळ्या रंगांच्या साड्या अन् घागरा

Chinchwad Crime : चिंचवडमध्ये टेम्पो चालकाला लुटले; गुन्हेगारांना अटक

हॉस्टेलमध्ये झोपलेल्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यात मित्रांनी घातलं फेविक्विक, ८ जणांना रुग्णालयात केलं दाखल

Ajit Pawar यांना पुण्यातील महिलेचा सल्ला, दादा बघा काय म्हणाले? | Pune News | Manohar Parrikar | Sakal News

SCROLL FOR NEXT