Shreyas Iyer File Photo
IPL

"तर श्रेयस अय्यरला मिळणार T20 World Cupचं तिकीट"

विराज भागवत

IPL स्पर्धेत अनेक खेळाडूंच्या फॉर्मबाबत व्यक्त केली जातेय चिंता

IPL 2021: स्पर्धेत सध्या चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या तीन संघातील खेळाडू उत्तम कामगिरी करत आहेत. कर्णधार विराट कोहलीच्या फॉर्मबद्दल चिंता व्यक्त केली जात होती. पण गेल्या दोन सामन्यात विराटने अर्धशतके ठोकलू अन् आपण लयीत परतल्याचे जाहीर केले. पण, मुंबई इंडियन्स संघाचे त्रिकूट सध्या फॉर्मशी झुंजत आहे. सूर्यकुमार यादव, इशान किशन आणि हार्दिक पांड्या या तिघांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं आहे. याबद्दल BCCIच्या एका अधिकाऱ्याकने महत्त्वाची माहिती दिली आहे.

"IPLमधील काही खेळाडूंच्या फॉर्मबद्दल चिंता व्यक्त करण्यात येत आहे. IPL मध्ये अजूनही काही सामने शिल्लक आहेत. तोपर्यंत हे खेळाडू लयीत परततील अशी शक्यता आहे. सूर्यकुमारने गेल्या काही महिन्यात चांगली कामगिरी केल्यामुळे त्याच्या फॉर्मबद्दल चिंता नाही. इशान किशननेदेखील श्रीलंकेत चांगली कामगिरी केली असल्याने त्याला लयीत परतण्यास फार काळ लागणार नाही. विराटने रविवारी त्याच्याशी संवाद साधला आहे. दोघांच्या कामगिरीवर संघाची नजर आहे", असे BCCIशी संपर्कात असलेल्या सूत्राने सांगितले.

Mumbai-Indians

"हार्दिक पांड्या दुखापतीतून सावरतो आहे.अशा परिस्थितीत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या संघाने त्याच्या दुखापतीत वाढ होणार नाही याची योग्य ती खबरदारी घेतली आहे. पण पुढील काही सामन्यांमध्ये जर खेळाडूंच्या कामगिरीत सुधारणा झाली नाही, तर मात्र १५ सदस्यीय संघात श्रेयस अय्यरला स्थान देण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. सध्यातरी असं म्हणणं घाईचे ठरेल, पण असा निर्णय झालाच तर त्या वर आश्चर्य वाटू नये", अशी माहिती BCCIशी संबंधित असलेल्या सूत्राने दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khadakwasla Dam: खडकवासला धरणातील विसर्ग ४,७०८ क्युसेक; धरणसाखळीत ७८.४९ टक्के पाणीसाठा; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Maharashtra Farm Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय! 2 लाखांपर्यंत कर्जमाफी अन् 48 हजार कोटींची वीज बिले माफ; काय म्हणाले आमदार गाडगीळ, खाडे?

Latest Marathi News Live Update : CJP च्या शिष्टमंडळाची सरकारसोबतची बैठक संपली, नेमकी काय चर्चा झाली?

Pandharpur Wari: २७ वर्षाची परंपरा असलेल्या थापलिंग पायी दिंडी सोहळ्यात तरुणांचा उस्फूर्त सहभाग

Mahabhumi Portal: सरकारी कचेऱ्यांचे हेलपाटे थांबणार ; जमीन नकाशे अन् 'क' प्रत आता महाभूमीवर एका क्लिकवर !

SCROLL FOR NEXT