Shreyas Iyer Pat Cummins Toss Conversations KKR vs SRH Qualifier 1  esakal
IPL

KKR vs SRH : हैदराबादनं टॉस जिंकला अन् श्रेयस हसला; अहमदाबादमध्ये कमिन्स 'असा' हरला

अनिरुद्ध संकपाळ

Shreyas Iyer Pat Cummins Toss Conversations KKR vs SRH Qualifier 1 : आयपीएलचा पहिला क्वालिफायर सामना अहमदाबादमध्ये झाला. अहमदाबादच्या याच नरेंद्र मोदी स्टेडियमवर 140 कोटी भारतीयांच स्वप्न पॅट कमिन्सन तोडलं होतं. आता तोच पॅट कमिन्स हैदराबादचा संघ घेऊन पाईंट टेबलच्या टॉपर्स केकेआरला भिडणार होता. कमिन्स अन् अहमदाबादचं इक्वेशन या सामन्यातही चर्चेचा विषय होता.

त्यात कमिन्स टॉस जिंकला, टॉस जिंकला म्हणजे अर्धा सामना इथंच जिंकला असं सर्वांना वाटत होतं. मात्र कमिन्स टॉस जिंकून बॅटिंग घेतली. त्यानं संघात तगडे बॅट्समन असतानाही बॉलर्सवर जास्तच विश्वास दाखवला. त्याला वाटलं की आपलं बॉलिंग युनिट टार्गेट डिफेंड करेल.

दुसरीकडं श्रेयस अय्यरच्या मनात लड्डू फुटले. त्याला हवं होतं तेच झालं होतं. तो टॉस जिंकल्यावर बॉलिंग करणार होता. अन् कमिन्स त्याच्या मनातली इच्छा एका झटक्यात पूर्ण केली. टॉस झाल्यावर अय्यरनं तसं बोलूनही दाखवलं.

आता अय्यर असंच दबाव टाकायचा म्हणून मोठं बडबडला होता की खरंच या पिचवर पहिल्यांदा बॉलिंग करणं योग्य होतं हे सामना सुरू झाल्यावरच स्पष्ट होणार होतं. तसं ते सामना सुरू झाल्यावर पहिल्या पाच ओव्हरमध्येच स्पष्ट झालं.

केकेआरनं ज्या घोड्यावर 24.75 कोटी रूपये लावले होते त्याच घोड्यानं संघाला फायनलचा रस्ता दाखवून दिला. ऑस्ट्रेलियाची तोफ स्टार्कनं हंगामाची सुरूवात फार काही चांगली केली नाही. तरी संघानं त्याच्यावर विश्वास दाखवत त्याला प्रत्येक सामन्यात खेळवला.

जबाबदारीची जाणीव असलेल्या या पठ्ठ्यानं संघाला गरज होती त्यावेळी मोठी कामगिरी करून दाखवत विश्वास सार्थ केला. हैरदाबादची पाच ओव्हरमध्ये चार बॅट्समन फज्जाला पाय लावून पॅव्हेलियनमध्ये परतले होते. त्यातील्या तीन बॅट्समनची शिकार एकट्या स्टार्कनं केली होती. त्यानं हेडला तर सामन्याच्या दुसऱ्याच बॉलवर घरचा रस्ता दाखवला.

खरं तर सामन्याचा टोन इथंच सेट झाला होता. मात्र राहुल त्रिपाठी नावाच्या अवलिया फलंदाजानं हैदराबादला फाईट बॅक करून दिलं. हा पठ्ठ्या देखील मोठ्या सामन्यात मोठं योगदान देण्यात तरबेज! त्यानं 55 धावांची इनिंग खेळली. क्लासेननं देखील 32 धावा करत त्याला चांगली साथ दिली. संघानं 11 षटकात शतक पार केलं. असं वाटलं आता हैदराबाद धावांचा डोंगर उभारणार.

मात्र केकेआरचे चक्रवर्तीनं चक्र फिरवलं अन् क्लासेनला गंडवलं. त्यानंतर चंचल त्रिपाठी रन आऊट झाला. इथून हैदराबादची गाडी अशी काही घसरली की त्यांची अवस्था 9 बाद 124 धावा अशी झाली. मात्र कॅप्टन कमिन्सच्या 30 धावांच्या खेळीनं हैदराबादनं 159 धावाचा आकडा गाठला.

केकेआरसमोर जरी फक्त 160 धावांचं आव्हान असलं तरी हे आव्हान दिसतं तेवढं सोपं नव्हतं. पिच तसं संथ होतं. त्यामुळं सामन्यात काहीही घडू शकत होतं. मात्र केकेआरनं एक भन्नाट प्लॅन आखला होता. पॉवर प्लेमध्ये बॉल नवा अन् टणक असतो त्याचा फायदा घेत त्यांनी तुफान फटकेबाजी केली. यात केकेआरनं दोन विकेट्स देखील गमावल्या मात्र त्यांनी 6 ओव्हरमध्ये 60 धावांचा टप्पा गाठला होता.

यानंतर व्यंकटेश अय्यरनं हैदराबादचा हुकमी एक्का कमिन्सची धुलाई सुरू करत हैदराबादला बॅकफूटवर ढकललं. बॅकफूटवर गेलेल्या हैदराबादला नंतर श्रेयस अय्यरनं सळो की पळो करून साडलं. या दोन्ही अय्यरनी आठ षटकातच शतकी भागीदारी रचली. त्यांनी केकेआरच्या विजयाचा कळस 14 व्या षटकातच चढवला अन् चौथ्यांदा आयपीएलची फायनल गाठली.

(IPL 2024 Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates : हिंदीविरोधातील स्टॅलिन यांच्या लढ्याला आमच्या शुभेच्छा - संजय राऊत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT