Shubman Gill IPL 2023 esakal
IPL

Shubman Gill IPL 2023 : शुभमन गिल भिडला; मात्र पंजाबने सामना शेवटच्या षटकात नेला अन् गुजरातला घाम फुटला

अनिरुद्ध संकपाळ

Shubman Gill IPL 2023 : पंजाब किंग्जने गतविजेत्या गुजरातसमोर फक्त 154 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र ते आव्हान पार करतानाही गुजरात टायटन्सला घाम फुटला. अखेर शुभमन गिलने किल्ला शेवटच्या षटकापर्यंत लढवत 49 चेंडूत 67 धावा केल्या. मात्र तो बाद झाला त्यावेळी सामना 4 चेंडूत 6 धावा असा आला होता. अखेर विजयासाठी 2 चेंडूत 4 धावांची गरज असताना तेवतियाने चौकार मारत सामना जिंकून दिला. शुभमन गिलने 49 चेंडूत 67 धावा केल्या.

प्रथम फलंदाजी करावी लागलेल्या पंजाब किंग्जने गुजरात टायटन्स समोर विजयासाठी 154 धावांचे माफक आव्हान ठेवले होते. गुजरातनेही या आव्हानाचा पाठलाग करताना पॉवर प्लेमध्ये दमदार सुरूवात करत जवळपास 10 च्या सरासरीने धावा केल्या. मात्र 48 धावांवर वृद्धीमान साहा बाद झाला अन् गुजरातची धावगती मंदावू लागली.

पंजाबच्या गोलंदाजांनी शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांना चांगलेच जखडून ठेवले. यामुळे 10 षटके उलटून गेली तरी गुजरातने शंभरी पार केली नव्हती. साई सुदर्शन 20 चेंडूत 19 धावा केल्या. तर हार्दिक पांड्याही 11 चेंडूत 8 धावा करून बाद झाला.

दुसऱ्या बाजूने शुभमन गिल किल्ला लढवत होता. त्याने संघाचे शतक 15 व्या षटकात पार करून दिले. यानंतर डेव्हिड मिलर आणि गिलने चौथ्या विकेटसाठी 42 धावांची भागीदारी रचली. मात्र तोपर्यंत पंजाबने सामना शेवटच्या षटकापर्यंत नेला होता.

शेवटच्या षटकात 7 धावांची गरज असताना 49 चेंडूत 67 धावा करणारा शुभमन गिल सॅम करनच्या गोलंदाजीवर त्रिफळा उडाला. यानंतर क्रिजवर आलेल्या राहुल तेवतियाने विजयासाठी 2 चेंडूत 4 धावांची गरज असताना चौकार मारत टेन्शनवाला सामना पुन्हा एकदा जिंकून दिला.

(Sports Latest News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026, MI vs RCB : बंगळुरूने मारलं वानखेडेचं मैदान, मिळवला तिसरा विजय; मुंबई इंडियन्सची पराभवाची हॅट्रिक

IPL 2026: मुंबई इंडियन्सचं काय चुकतंय? RCB विरूद्धच्या पराभवानंतर हार्दिक पांड्याने स्पष्टच सांगितलं

CM Fund: आगाऊ ३०% रक्कम, ८ तासांत निर्णय अन्...; मुख्यमंत्री सहायता निधी प्रक्रियेत ऐतिहासिक बदल, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

MI vs RCB: रोहित शर्माने IPL मध्ये मोठा विक्रम रचला, पण आऊट न होताही अचानक का सोडलं मैदान? मुंबई इंडियन्सने सांगितलं कारण

दुसरी, तिसरी, चौथीचा बदलणार अभ्यासक्रम! नवीन अभ्यासक्रमासाठी ४ मेपासून शिक्षकांचे प्रशिक्षण, ३० मेपर्यंत तीन टप्प्यात शिक्षकांचे प्रशिक्षण, वाचा...

SCROLL FOR NEXT