Shubman Gill furious as third umpire after last-minute change in wide call on DRS vs Sanju Samson sakal
IPL

RR vs GT IPL 2024 : एका वाईड बॉलवरून सामन्यात झाला राडा! थर्ड अंपायरने अचानक मारली पलटी

Shubman Gill furious as Third Umpire RR vs GT IPL 2024 : आयपीएलमध्ये पंचांच्या निर्णयावर अनेकवेळा गदारोळ झाला आहे. आज बुधवारी राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात झालेल्या सामन्यातही असेच काहीसे पाहायला मिळाले.

Kiran Mahanavar

Shubman Gill furious as Third Umpire RR vs GT IPL 2024 : आयपीएलमध्ये पंचांच्या निर्णयावर अनेकवेळा गदारोळ झाला आहे. आज बुधवारी राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात झालेल्या सामन्यातही असेच काहीसे पाहायला मिळाले. यादरम्यान थर्ड अंपायरच्या निर्णयावरून मोठा गदारोळ झाला. ही घटना राजस्थान रॉयल्सच्या 17 व्या षटकात घडली.

त्याचं झालं असं की, सामन्याच्या १७व्या ओव्हरचा शेवटचा चेंडू मोहित शर्मा टाकायला आला. त्याने स्लो बॉल टाकताच तो ऑफ स्टंपपासून लांब होता. इकडे स्ट्राईकवर असलेल्या संजू सॅमसनने शॉट मारण्याचा पर्यंत केला. मात्र तो हुकला आणि यानंतर अंपायरने वाइड बॉल दिला.

पंचांच्या या निर्णयानंतर शुभमन गिलने रिव्यू घेतला. थर्ड अंपायर अनंतपद्मनाभन यांनी आधी फेअर डिलिव्हरी दिली. मैदानावरील अंपायरनेही आपला वाइड सिग्नल मागे घेतला. पण तितक्यात तिसरा अंपायरने पुन्हा एकदा रिव्यू पाहिला आणि यावेळी तो म्हणाला की हा बॉल वाइड आहे.

थर्ड अंपायरच्या या निर्णयाने त्यानंतर मैदानावर खळबळ उडाली. गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल चांगलाच संतापलेला दिसला. त्याने मैदानावरील पंचांशी देखील या विषयावर चर्चा केली, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही आणि त्याने आपला रिव्ह्यू गमावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thailand Pub Fire : पबमध्ये मध्यरात्री भीषण अग्नितांडव, २७ जणांचा होरपळून मृत्यू, ६३ गंभीर जखमी; दुर्घटनेचा थरारक व्हिडिओ समोर

Constitutional Amendment India: मंत्रिपदावरून हटविण्याऐवजी निलंबन;प्रस्तावित १३०व्या घटनादुरुस्ती विधेयकाबाबत संसदीय समितीची शिफारस

शेतकऱ्यांना ३१ जुलैपूर्वी कर्जमाफी! ३ टप्प्यात कर्जमाफी, १५ लाख शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा होणार; पहिल्यांदा कर्जमाफी कोणाला? निकष काय बदलले, वाचा सविस्तर...

अर्थवेध : भारतीय गुंतवणूकदारांचा विजय; ‘एफआयआय’ युगाचा अस्त?

ढिंग टांग : वैशाखनंदन संवाद..!

SCROLL FOR NEXT