Shubman Gill esakal
IPL

Shubman Gill : शुभमन गिल होणार गुजरात टायटन्सचा नवा कर्णधार; भारतीय संघासाठी देखील अजून एक 'युवा' पर्याय?

Shubman Gill could be the new captain of the Gujarat Titans; a 'young' option for the Indian team as well?

अनिरुद्ध संकपाळ

Shubman Gill : गुजरात टायन्सला पहिल्याच हंगामात विजेतेपदापर्यंत पोहचवणारा हार्दिक पांड्या आता मुंबई इंडियन्समध्ये परतला आहे अशी माहिती सूत्रांनी दिली. रविवारी (दि. 26) रात्री उशिरा घडलेल्या घडामोडीनुसार मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स या दोन्ही फ्रेंचायजींच्या नेतृत्वात बदल होण्याची शक्यता आहे. हार्दिक मुंबई इंडियन्समध्ये गेल्यामुळे आता गुजरातचे नेतृत्व युवा शुभमन गिलच्या हातात जाण्याची शक्यता आहे.

शुभमन गिलकडे जर गुजरात टायटन्सचे नेतृत्व आले तर तो भारतीय संघाच्या भविष्यातील कर्णधारांच्या रेसमध्ये देखील दाखल होणार आहे. रोहित शर्मानंतर वनडेचा कर्णधार कोण याची चाचपणी बीसीसीआय नक्कीच करत असेल. जर शुभमन गिलने (Shubman Gill )आपले नेतृत्वगुण दाखून दिले तर त्याच्याकडे देखील एक सक्षम पर्याय म्हणून पाहिले जाऊ शकते.

अखेर 72 तासाचे नाट्य संपवत गुजरात टायन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या आपल्या जुन्या फ्रेंचायजी मुंबई इंडियन्समध्ये परतला आहे. रविवारी सायंकाळी 5 वाजता आयपीएल फ्रेंचायजींसाठी रिटेंशनची मुदत संपली. तोपर्यंत हार्दिक हा गुजरात टायटन्समध्येच होता. कारण मुंबई आणि गुजरात यांच्यातील हार्दिकच्या ट्रेड ऑफबाबतची कागदपत्रे पूर्ण झाली नव्हती. त्यामुळे आयपीएल आणि बीसीसीआयने या ट्रान्सफरला हिरवा कंदील दाखवला नव्हता.

दरम्यान, रात्री उशिरा हार्दिक पांड्या (Hardik Pandya) मुंबई इंडियन्समध्ये जाणार यावर शिक्कामोर्तब झालं. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितलं की, 'हार्दिकची ट्रेड ऑफ प्रक्रिया सायंकाळी 5 नंतर पूर्ण झाली. आता तो अधिकृतरित्या मुंबई इंडियन्सचा खेळाडू झाला आहे. हा व्यवहार तीन पार्टींमध्ये ऑल कॅश डीलद्वारे झाला. मुंबईने कॅमेरून ग्रीनला आरसीबीला ट्रेड ऑफ केलं. त्यानंतर तो फंड गुजरातकडून हार्दिकला ट्रेड ऑफ करून आपल्या गोटात खेचण्यासाठी वापरण्यात आला.'

मुंबई इंडियन्सने ग्रीनला 17 कोटी रूपये देऊन गेल्या लिलावात खरेदी केलं होतं. यंदाच्या लिलावात मुंबई इंडियन्सला हार्दिकला आपल्या गोटात खेचण्यासाठी मोठ्या रक्कमेची गरज होती. जोपर्यंत ग्रीनचे ट्रेडऑफ होत नाही तोपर्यंत ही रक्कम मुंबई इंडियन्सच्या पर्समध्ये आली नसती.

गुजरात टायन्सने हार्दिक पांड्याकडे संघाचे नेतृत्व सोपवल्यानंतर सलग दोन वर्षे संघाने फायनल खेळली आहे. पहिल्याच हंगामात गुजरातने विजेतेपदाला गवसणी घातली होती. हार्दिक पांड्याला त्यावेळी 15 कोटी रूपयाला गुजरातने खरेदी केलं होतं.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramdas kadam : रामदास कदम यांचा आणखी एक खळबळजनक दावा, थेट उद्धव ठाकरेंना आव्हान

Crime News : गोळीबार प्रकरण: पंचवटी पोलिसांकडून १४वा संशयित जेरबंद, आतापर्यंत माजी नगरसेवकासह १४ अटकेत

World Cup 2025: भारताविरुद्ध पाकिस्तानने टॉस जिंकला, प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल; हस्तांदोलन झालं की नाही?

Sangli Accident Death : काम संपवून घरी निघाला होता, समोरू दुचाकी आली अन् दोघेही जाग्यावर संपले; सांगलीतील घटना

Latest Marathi News Live Update: राज ठाकरे मातोश्रीवर दाखल!

SCROLL FOR NEXT