Gujarat Titans | IPL 2024 Sakal
IPL

IPL 2024, GT vs PBKS: 'हेच आयपीएल आहे, जिथे...', कर्णधार गिलने सांगितलं 200 धावांचं लक्ष्य देऊनही का हरली गुजरात

Shubman Gill: पंजाब किंग्सविरुद्ध गुजरात टायटन्सकडून काय चूक झाली हे कर्णधार शुभमन गिलने सांगितले आहे.

Pranali Kodre

IPL 2024, GT vs PBKS: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत 17 वा सामना गुरुवारी गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात पार पडला. या सामन्यात पंजाबने एक चेंडू राखून 3 विकेट्सने रोमांचक विजय मिळवला.

या सामन्यात गुजरातने 200 धावांचे लक्ष्य पंजाबला दिले होते. या लक्ष्याचा पाठलाग पंजाबने अखेरच्या षटकात पूर्ण केला. दरम्यान, या सामन्यात गुजरातच्या क्षेत्ररक्षकांकडून काही झेलही सुटले, याचबद्दल कर्णधार शुभमन गिलनेही सामन्यानंतर भाष्य केले.

गिल म्हणाला, 'काही झेल सुटले. अशा चांगल्या खेळपट्टीवर जर तुम्ही झेल सोडले, तर विजय कठीण होऊन जातो. अशा परिस्थितीत धावांचा बचाव करणे अवघड असते. नवीन चेंडूवर फलंदाजांना संघर्ष करावा लागत होता.

'अशा काही जागा आहेत, जिथे सुधारणेची गरज आहे. मला वाटते २०० धावा पुरेशा होत्या आणि आमचे 15व्या षटकापर्यंत सामन्यात पारडेही जड होते.'

'जेव्हा तुम्ही झेल सोडता, तेव्हा तुम्ही अडचणीत येता. नळकांडेने गेल्या सामन्यात ज्याप्रकारे गोलंदाजी केली होती, त्यामुळे आम्हाला त्याला शेवटच्या षटकात गोलंदाजी द्यायची होती. हेच आयपीएल आहे, तुम्ही ज्यांना पाहिलेही नसते असे खेळाडू येऊन सामना जिंकून देतात.

या सामन्यात पंजाबला 200 धावांचा लक्ष्य पार करून देण्यात शशांक सिंगने मलोचा वाटा उचलला. त्याने 29 चेंडूत 6 चौकार आणि 4 षटकार मारत नाबाद 61 धावांची खेळी केली. तसेच त्याने अशुतोष शर्माबरोबर 7 व्या विकेटसाठी 43 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. अशुतोषने 17 चेंडूत 31 धावांची खेळी केली. गुजकातकडून नूर अहमदने 2 विकेट्स घेतल्या.

तत्पुर्वी, गुजरातने 20 षटकात 4 बाद 199 धावा केल्या होत्या. गुजरातकडून कर्णधार शुभमन गिलने 48 चेंडूत 6 चौकार आणि 4 षटकारांसह नाबाद 89 धावांची खेळी केली. तसेच साई सुदर्शनने 19 चेंडूत 33 धावांची खेळी केली. पंजाबकडून कागिसो रबाडाने 2 विकेट्स घेतल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली! भामा आसखेड धरण निम्म्याहून अधिक फुल्ल; आकडेवारी समोर

Water Level: अडाण जलाशयाच्या पाणीसाठ्यात आठवड्याभरात चार टक्क्यांनी वाढ;४५.७५ टक्के जलसाठा

Latest Maharashtra News Live Updates: आषाढी एकादशी निमित्तानं कल्याण इथल्या बिर्ला महाविद्यालयात ज्ञान दिंडी सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सहभाग

Tanisha Kotecha : नाशिकच्या तनिषा कोटेचाचे आशियाई टेबल टेनिस स्पर्धेत शानदार यश

HPCL Recruitment 2025: हिंदुस्तान पेट्रोलियमकडून 2.80 लाख पगाराची नोकरी! 300 हून अधिक जागा; जाणून घ्या अर्ज कसा करावा

SCROLL FOR NEXT