Shubman Gill Virat Kohli IPL Record CSK vs GT
Shubman Gill Virat Kohli IPL Record CSK vs GT esakal
IPL

Shubman Gill CSK vs GT : फक्त 123 धावा! शुभमन गिल विराट कोहलीचा मोठा विक्रम मोडणार?

अनिरुद्ध संकपाळ

Shubman Gill Virat Kohli IPL Record CSK vs GT : शुभमन गिलने आयपीएलच्या 16 व्या हंगामात शतकांचा धडाकाच लावला आहे. त्याने आतापर्यंत तीन शतकी खेळी करत गुजरातला सलग दुसऱ्यांदा आयपीएलच्या फायनलमध्ये पोहचवण्यात मोलाचा वाटा उचलला. गिलने क्वालिफायर 2 सामन्यात मुंबई इंडियन्सविरूद्ध 129 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर गुजरातने 234 धावा ठोकल्या.

शुभमन गिलचे हे यंदाच्या हंगामातील तिसरे शतक होते. गिलने आतापर्यंत हंगामात 16 सामन्यात 60.79 च्या सरासरीने 851 धावा ठोकल्या आहेत. आयपीएलच्या इतिहासात एका हंगामातील सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत गिल आता तिसऱ्या क्रमांकावर आहे.

या यादीत विराट कोहली 973 धावा करून अव्वल स्थानावर आहे. त्याने 2016 च्या हंगामात 16 सामन्यात 4 शतके आणि 7 अर्धशतके ठोकत ही कामगिरी केली होती.

या यादीत राजस्थान रॉयल्सचा जॉस बटलर दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने 2022 च्या हंगामात 17 सामन्यात 57.53 च्या सरासरीने 863 धावा केल्या होत्या. यात त्याने 4 शतके आणि 4 अर्धशतके ठोकली होती.

गतविजेत्या गुजरात टायटन्सने मुंबईचा पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे. आता ते चेन्नई सुपर किंग्जविरूद्ध खेळणार आहेत.

या सामन्यात शुभमन गिलकडून अजून एका शतकाची अपेक्षा आहे. गिलने हैदराबाद, आरसीबी आणि मुंबई इंडियन्सविरूद्ध शतकी खेळी केली आहे.

गिलला एका हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहचण्यासाठी फक्त 13 धावांची गरज आहे. जर त्याने चेन्नईविरूद्ध 13 धावा केल्या तर तो बटलरला मागे टाकेल.

गिलने मुंबईप्रमाणे चेन्नईविरूद्ध देखील शतकी धमाका केला तर तो एका हंगामात चार शतके ठोकण्याच्या विराट आणि बटलरच्या विक्रमाशी बरोबरी करेल. तसेच जर ही शतकी खेळी 123 धावांची झाली तर तो विराट कोहलीचे एका हंगामात 973 धावा करण्याचे मोठे रेकॉर्ड मोडू शकतो.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेस पुन्हा गोत्यात! भाजप मुद्दा पेटवणार, जयराम रमेश यांची सारवासारव

वाढदिवस साजरा करुन परतताना काळाचा घाला! तासगाव-मणेराजुरी मार्गावर कार कालव्यात पडून एकाच कुटुंबातील 5 जण ठार

Latest Marathi News Live Update : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात महिला मतदारांची बाजी

Share Market Today: आज शेअर बाजारात कोणते शेअर्स खरेदी कराल? कशी असेल बाजाराची स्थिती?

Cucumber Sandwich Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा काकडीचे चवदार सॅंडविच, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT