GT vs LSG IPL 2023
GT vs LSG IPL 2023  esakal
IPL

GT vs LSG : हार्दिकच्या गुजरातने कृणालच्या लखनौला शिकवला चांगलाच धडा मात्र गिल - साहाचे अधुरे राहिले शतक

अनिरुद्ध संकपाळ

GT vs LSG IPL 2023 : आयपीएलच्या 51 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सला नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय फार महागात पडला. गुजरात टायटन्सने 20 षटकात 2 बाद 227 धावा ठोकत लखनौच्या गोलंदाजांना चांगलाच घाम फोडला.

गुजरातकडून सलामीवीर शुभमन गिलने 51 चेंडूत 94 धावा ठोकल्या. तर वृद्धीमान साहाने 43 चेंडूत 81 धावांची धडाकेबाज खेळी केली. लखनौकडून आवेश खान आणि मोहसीन खान यांनाच विकेट घेण्यात यश मिळाले.

विशेष म्हणजे नाणेफेक जिंकल्यानंतर कृणाल पांड्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचवेळी हार्दिक म्हणाला होता की आम्ही जर नाणेफेक जिंकली असती तर प्रथम फलंदाजीच केली होती. त्यामुळे मला जे हवे होते ते झाले. पहिल्या डावानंतर कृणालचा गोलंदाजी करण्याचा निर्णय फसल्याचे दिसते.

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या लखनौ सुपर जायंट्सला पॉवर प्ले काही चांगला गेला नाही. गुजरातचे सलामीवीर वृद्धीमान साहा आणि शुभमन गिल यांनी लखनौच्या गोलंदाजांची पहिल्या 6 षटकात धुलाई करत तब्बल 78 धावा ठोकल्या. वृद्धीमान साहाने तर 20 चेंडूत अर्धशतक ठोकले.

पॉवर प्लेमध्ये धमाका केल्यानंतर साहाने त्यानंतरही आपली आक्रमक फलंदाजी कायम ठेवली. त्याला आता शुभमन गिल देखील साथ देऊ लागला होता. त्या दोघांनी गुजरातला आठव्या षटकातच शतकी मजल मारून दिली.

वृद्धीमान साहाने अर्धशतक ठोकल्यानंतर गिअर बदलेल्या शुभमन गिलने देखील आपले अर्धशतक पूर्ण केले. या दोघांनी 142 धावांची दमदार सलामी दिली. अखेर शुभमन गिलने 41 चेंडूत 83 धावांचा तडाखा देणाऱ्या वृद्धीमान साहाला बाद करत ही जोडी फोडली. साहा बाद झाल्यानंतर आलेल्या हार्दिक पांड्याला आल्या आल्या धावगती वाढवता आली नाही. त्यामुळे गुजरातची धावगती मंदावू लागली.

पांड्याने 15 व्या षटकानंतर धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला मात्र तो 15 चेंडूत 25 धावा करून बाद झाला. यानंतर शुभमन गिलने आक्रमक फटकेबाजी करत 51 चेंडूत नाबाद 94 धावा ठोकल्या. शेवटच्या षटकात नव्वदीत पोहचलेला गिल शतक पूर्ण करेल असे वाटत होते. मात्र त्याला ती संधी मिळाली नाही. गिलला साथ देणाऱ्या डेव्हिड मिलरने 12 चेंडूत 21 धावा ठोकल्या अन् गुजरातने 20 षटकात 2 बाद 227 धावांपर्यंत मजल मारली.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Bomb Threat : सरकारी रुग्णालयांनंतर दिल्लीतील विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी

Team India Racism : भारतीय क्रिकेट संघात होतोय वंशभेद..? वर्ल्डकप विजेत्या संघातील माजी खेळाडूचा धक्कादायक खुलासा

Latest Marathi News Live Update : पॅरामोटरिंग करताना तरुणीचा अपघात

गोफण | भटकती आत्मा.. ऑफर नव्हे सल्ला! प्रकरण कोर्टात

मोठी बातमी! विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच मिळणार ‘आरटीई’ प्रवेश; शालेय शिक्षणचा नवा आदेश; शुक्रवारपासून नव्याने करावे लागणार अर्ज

SCROLL FOR NEXT