Simon Doull Slams Virat Kohli 
IPL

IPL 2023 : 'त्याला फक्त रेकॉर्डची चिंता...' विराट कोहलीवर दिग्गज खेळाडूचा गंभीर आरोप

विराट कोहलीवर लावला मोठा आरोप

Kiran Mahanavar

Simon Doull Slams Virat Kohli IPL 2023 : आयपीएलच्या 15व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. आरसीबीचा तीन सामन्यांतील हा दुसरा पराभव आहे. शेवटच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता.

आरसीबीला मुंबई इंडियन्सविरुद्ध एकमेव विजय मिळाला आहे. अनुभवी फलंदाज विराट कोहलीने लखनौविरुद्ध अर्धशतक झळकावले, पण त्याचा संघ विजय मिळवू शकला नाही.

सामन्यादरम्यान कॉमेंट्री करताना न्यूझीलंडचा माजी खेळाडू आणि समालोचक साइमन डोलने विराटवर मोठा आरोप केला. तो म्हणाला की कोहलीला फक्त त्याच्या रेकॉर्डची काळजी आहे. सायमनने कोहलीच्या अर्धशतकाचा हवाला दिला. विराटने एकवेळ 25 चेंडूत 42 धावा केल्या होत्या. यानंतर पुढच्या आठ धावांसाठी त्याने 10 चेंडू घेतले. आरसीबीच्या माजी कर्णधाराने 35 चेंडूत अर्धशतक ठोकले.

साइमन डोल यावर प्रतिक्रिया देताना म्हणाला, कोहलीची सुरुवात एखाद्या हायस्पीड ट्रेनसारखी झाली. तो वेगवान फटके मारत होता. आपण हातोडा चालवतोय असे वाटत होते. नंतरच्या 42 वरून 50 पर्यंत पोहोचण्यासाठी त्याला 10 चेंडू लागले. त्याला त्याच्या विक्रमाची काळजी वाटत होती. तुम्ही धावा करत राहायला हव्यात, विशेषत: तुमच्याकडे भरपूर विकेट शिल्लक असताना.

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 2 बाद 212 धावा केल्या. प्रत्युत्तरात लखनौने नऊ गडी गमावून 213 धावा केल्या आणि अखेरच्या चेंडूवर सामना जिंकला. तो एका विकेटने जिंकला. या विजयासह लखनौचे चार सामन्यांतून सहा गुण झाले असून हा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर आला आहे.

या सामन्यात आरसीबीकडून विराट कोहलीने 44 चेंडूत 61, ग्लेन मॅक्सवेलने 29 चेंडूत 59 आणि कर्णधार फाफ डुप्लेसिसने 46 चेंडूत नाबाद 79 धावा केल्या. त्याचवेळी लखनौकडून मार्कस स्टॉइनिसने 30 चेंडूत 65 आणि निकोलस पूरनने 19 चेंडूत 62 धावा केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटनेचा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Latest Maharashtra News Live Updates: भंडारदरा परिसरात पावसाची बॅटिंग; पर्यटक लुटताय आनंद

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

Chh. Sambhajinagar School: महापालिकेच्या २५ शाळांचे प्रवेश फुल्ल;यंदा वाढले ९१८ विद्यार्थी, प्रशासनाने केल्या सर्व शाळा स्मार्ट

SCROLL FOR NEXT