Sourav Ganguly IPL 2023 Suryakumar Yadav esakal
IPL

Sourav Ganguly : सूर्याने आरसीबीला अस्मान दाखवलं अन् दादानं केलं ढासू ट्विट

अनिरुद्ध संकपाळ

Sourav Ganguly IPL 2023 Suryakumar Yadav : मुंबई इंडियन्ससाठी घरच्या मैदानावर झालेल्या रॉयल चॅलेंजर बेंगलोर विरूद्धचा सामना खूप महत्वाचा होता. प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी आरसीबीला मात देणे गरजेचे होते. त्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करत 200 धावांचे आव्हान ठेवले. या महत्वाच्या सामन्यात मुंबईचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने 35 चेंडूत 83 धावांची धडाकेबाज खेळी करत मुंबईला 17 व्या षटकातच विजय मिळवून दिला.

आरसीबीवरील या विजयामुळे मुंबई इंडियन्स गुणतालिकेत 12 गुणांसह तिसऱ्या स्थानावर झेप घेतली. तर आरसीबीचे प्ले ऑफचे स्वप्न आता जर तरच्या गणितावर अडकणार आहे. या विजयानंतर दिल्लीचा मेंटॉर सौरव गांगुलीने सूर्याच्या कौतुकाचे पूल बांधले. सौरव गांगुलीने सूर्याला टी 20 क्रिकेटमधला जगातील सर्वात चांगला फलंदाज ठरवले.

सूर्यकुमार यादवने आरसीबीविरूद्धच्या सामन्यात 35 चेंडूत 83 धावा ठोकल्या. यात सात चौकार आणि सहा षटकारांचा समावेश होता. त्याच्या या खेळीमुळे मुंबई इंडियन्सने सामना सहा विकेट्स राखून जिंकला. यानंतर सौरव गांगुलीने ट्विट केले की, 'सूर्यकुमार यादव हा टी 20 क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाज आहे. असं वाटतं की तो संगणकावर फलंदाजी करतोय.'

दादाच्या या ट्विटला मुंबई इंडियन्सने देखील दाद दिली. मुंबई इंडियन्सने ट्विट केले की, 'दादाकडून सूर्या दादाला फक्त आदरच.' सूर्यकुमार यादवने आपल्या आयपीएल कारकिर्दित 3,020 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 30.82 असून स्ट्राईक रेट 141.45 इतके आहे. त्याने आयपीएलमध्ये 20 अर्धशतकी खेळ्या केल्या आहेत. आरसीबीविरूद्धच्या 83 धावा ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Cabinet Meeting: सिडको आणि म्हाडाच्या प्रकल्पांसाठी नवीन धोरण तयार करणार अन्...; महायुती मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय

Post-COVID Diabetes Surge: कोरोनानंतर आरोग्याचे नवे संकट; बदललेल्या जीवनशैलीमुळे मधुमेहाच्या रुग्णांत वाढ

Latest Marathi Breaking News: जळगावात भाजपाचे तीन सदस्य बिनविरोध विजयी

Sangli Politics: ईश्वरपूरमध्ये उमेदवारीचा पाऊस! ३० जागांसाठी तब्बल २७२ अर्ज; नगराध्यक्षपदासाठी १४ दिग्गज रिंगणात

Sangli politics: आटपाडीत उमेदवारीची झुंबड! २२ नगराध्यक्ष आणि १९७ नगरसेवक अर्जांनी पहिल्याच निवडणुकीची रंगत वाढवली

SCROLL FOR NEXT