Kaviya Maran IPL 2023 esakal
IPL

Kaviya Maran VIDEO : फारुकीनं विकेट घेतली अन् काव्या ताईनं मारली उडी... मात्र कृणालनं आनंदावर फिरवलं पाणी

अनिरुद्ध संकपाळ

Kaviya Maran IPL 2023 : लखनौ सुपर जायंट्सने सनराईजर्सला 121 धावात रोखल्यावर ते सामना सहज जिंकतील असे वाटले होते. लखनौचे सलामीवीर कायल मेयर्स आणि केएल राहुल यांनी सुरूवात देखील चांगली केली. मात्र सनराईजर्स हैदराबादच्या फझलहक फारूकीने सलामीवीर मेयर्सला 13 धावांवर बाद करत लखनौला पहिला धक्का दिला.

या विकेटनंतर लो स्कोरिंग मॅच टाईट होईल असे वाटत होते. याच आनंदात सनराईजर्स हैदराबादच्या मालकीणबाई काव्या मारनने आनंदाने उडी मारली. तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मेयर्सनंतर आलेला दीपक हुड्डा देखील 7 धावांची भर घालून परतला. त्यामुळे तर काव्याच्या मनात विजयाचे लड्डू फुटले असतील.

मात्र या सगळ्या आनंदावर लखनौ सुपर जायंट्सचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्याने पाणी फेरले. गोलंदाजीत 18 धावात तीन बळी टिपणाऱ्या कृणालला फलंदाजीत देखील बढती मिळाली. याचा फायदा उचलत कृणालने 23 चेंडूत आक्रमक 34 धावांची खेळी केली. त्याने केएल राहुल सोबत तिसऱ्या विकेटसाठी 55 धावांची महत्वपूर्ण भागीदारी रचत संघाला शंभरी पार करून दिले. याचबरोबर हैदराबादच्या बाऊन्स बॅकचे सर्व दरवाजे त्याने बंद करून टाकले.

(Sports Latest News)

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sachin Tendulkar on Student Protest: "माझे वडील प्राध्यापक होते..."; सचिन तेंडुलकरची विद्यार्थ्यांसाठी भावनिक पोस्ट; म्हणाला, जेव्हा विद्यार्थ्यांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळत नाही...

Krishna River Project: कृष्णा नदीचे पाणी दुष्काळी भागाकडे वळविणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला शासनाची प्रशासकीय मान्यता; रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश

IND vs ZIM 1st T20I: वैभव सूर्यवंशीचा विश्वविक्रम, पण नाही मिळाला 'मॅन ऑफ दी मॅच' पुरस्कार; श्रेयस अय्यर काय म्हणाला वाचा...

Birth Certificate Name Change Ban : जन्म-मृत्यू दाखल्यातील पूर्ण नावबदलाला मज्जाव; फक्त मात्रा, स्पेलिंग दुरुस्तीला परवानगी

Tamhini Ghat Closure: ताम्हिणी घाट बंद; दरडी, रस्ता खचल्याने रायगड-पुणे प्रवासी व विद्यार्थ्यांचे हाल, वेळ व खर्च दुप्पट

SCROLL FOR NEXT