SRH vs DC Playing XI Match 34 of IPL 2023 Delhi Capitals Prithvi Shaw out cricket news in marathi kgm00 
IPL

SRH vs DC Playing 11 : दिल्ली कॅपिटल्सच्या संघात मोठा बदल, पृथ्वी शॉ बाहेर?

पृथ्वी शॉ, मार्शचे अपयश

सकाळ ऑनलाईन टीम

SRH vs DC Playing 11 : आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील दोन तळाचे संघ आज एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. दिल्ली कॅपिटल्स व सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये आज आयपीएल लढत रंगणार आहे. एकीकडे दिल्ली कॅपिटल्सचा संघ सलग दुसऱ्या विजयासाठी प्रयत्नांची शिकस्त करील, तर दुसरीकडे सनरायझर्स हैदराबादचा संघ सलग तिसरा पराभव टाळण्यासाठी मैदानात उतरेल.

दिल्ली संघाने 20एप्रिल रोजी झालेल्या लढतीत कोलकाता संघावर विजय मिळवला. तब्बल पाच लढतींतील पराभवांनंतर त्यांना विजय संपादन करता आला. अनुभवी गोलंदाज इशांत शर्मा याने १९ धावा देत दोन फलंदाज बाद करीत सामनावीराचा मान संपादन केला. आता गोलंदाजीत त्यांना सातत्यपूर्ण कामगिरी करावी लागणार आहे. ॲनरीक नॉर्किया हा दक्षिण आफ्रिकन वेगवान गोलंदाज छान कामगिरी करीत आहे.

पृथ्वी शॉ, मार्शचे अपयश

दिल्लीने आत्तापर्यंत एकच विजय मिळवला आहे. या विजयात कर्णधार डेव्हिड वॉर्नर (५७ धावा) व अक्षर पटेल (नाबाद १९ धावा) यांचा अपवाद वगळता दिल्लीच्या फलंदाजांना चमक दाखवता आली नाही. पृथ्वी शॉ व मिचेल मार्श या दोघांचे अपयश दिल्लीला बोचणी देणारे ठरत आहे.

पृथ्वीला सहा डावांमध्ये १२,७,०,१५,०,१३ अशा धावा करता आल्या आहेत. वेगवान गोलंदाजी असो किंवा फिरकी गोलंदाजी दोन्हीसमोर त्याची दैना उडत आहे. त्याने यामधून लवकरात लवकर बाहेर यायला हवे. मार्श खेळलेल्या चार डावांपैकी दोन डावांमध्ये शून्यावर बाद झाला आहे. गोलंदाजीतही त्याच्याकडून छान कामगिरी होत नाही. संघ व्यवस्थापनाकडून मार्शऐवजी रोवमन पॉवेल व रायली स्सी यांच्यापैकी एकाला संधी देण्यात आल्यास आश्चर्य वाटायला नको.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : पहिल्या घासाला खडा

Horoscope Prediction : आज धनयोग + सर्वार्थ सिद्धी योग! 'या' 5 राशींना होणार धनलाभ अन् भगवान विष्णू अनेक अडचणी दूर करणार!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 20 नोव्हेंबर 2025

ढिंग टांग : बिबटे : ठिपके आणि ठपके..!

Horoscope : शुक्र ग्रहात विशेष गोचर! बनतोय लक्ष्मी नारायण योग; 'या' राशीच्या लोकांच्या अपूर्ण इच्छा होणार पूर्ण, पैशाची अडचण संपणार

SCROLL FOR NEXT