SRH vs MI IPL 2024 Match Suryakumar Yadav sakal
IPL

IPL 2024 : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर मुंबई इंडियन्सला मोठा धक्का! SRH विरुद्धच्या सामन्यातून स्टार खेळाडू बाहेर

SRH vs MI IPL 2024 Match Suryakumar Yadav : हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सची आयपीएल 2024 मधील त्यांच्या मोहिमेची सुरुवात पराभवाने झाली.

Kiran Mahanavar

SRH vs MI IPL 2024 Match Suryakumar Yadav : हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सची आयपीएल 2024 मधील त्यांच्या मोहिमेची सुरुवात पराभवाने झाली. गुजरात टायटन्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला होता.

पाच वेळची चॅम्पियन टीम मुंबई इंडियन्स 27 मार्च रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध आपला दुसरा सामना खेळणार आहे, मात्र त्याआधीच संघाला मोठा धक्का बसला आहे. दुसऱ्या फिटनेस टेस्टनंतरही एनसीएने मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवला क्लीन चिट दिलेली नाही. आता सूर्यकुमार यादव हैदराबादविरुद्धच्या सामन्यातही खेळणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दुसऱ्या फिटनेस टेस्टनंतरही सूर्यकुमार यादवला एनसीएकडून खेळण्यासाठी क्लीन चिट मिळालेली नाही. काही दिवसांपूर्वी एक रिपोर्ट समोर आला होता ज्यामध्ये 21 मार्च रोजी सूर्याची दुसरी फिटनेस टेस्ट घेण्यात आली होती. त्याची पुनर्वसन प्रक्रिया सुमारे 2 आठवड्यांपूर्वी सुरू झाली होती, परंतु दोनदा फिटनेस टेस्ट प्रक्रियेतून गेल्यानंतरही त्याला खेळण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. कारण जूनमध्ये टी-20 वर्ल्डकपमध्ये खेळला जाणार आहे. अशा परिस्थितीत बीसीसीआयला सूर्याबाबत कोणताही धोका पत्करायचा नाही.

सूर्यकुमार यादवच्या पाठीवर 17 जानेवारीला जर्मनीमध्ये स्पोर्ट्स हर्नियाची शस्त्रक्रिया झाली होती. डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर झालेल्या टी-20 मालिकेदरम्यान सूर्यकुमार यादवला दुखापत झाली होती. या दुखापतीतून सावरण्यासाठी त्याला एक महिना लागू शकतो, असा अंदाज होता, पण आता तो मैदानापासून दूर असल्याने बराच वेळ निघून गेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Labour Laws: मोदी सरकारची ऐतिहासिक चाल! नवीन कामगार कायदे तात्काळ लागू; आता शोषणाला लगाम बसणार

Train Maggie video: मॅगी तयार.. ट्रेनमध्येच थाटलं किचन! मराठमोळ्या काकूंनी कायदा घेतला हातात, व्हिडीओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : 250 कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात सिद्धांत कपूर आणि ओरीला मुंबई पोलिसांची समन्स

१० वर्ष डेट केलं पण २ वर्षात लग्न तुटलं; अपूर्वा नेमळेकरने सांगितलं घटस्फोटाचं कारण, म्हणाली- मी चुकले

Maval Leopard : खेड–जुन्नरनंतर आता शिरगावात बिबट्या; शेतशिवारात भीतीचं सावट!

SCROLL FOR NEXT