IPL 2022 Sunil Gavaskar Matthew Hayden  esakal
IPL

IPL 2022: सेमी फायनलबाबत गावसकर-हेडनची भविष्यवाणी; मुंबईला वगळले

सकाळ डिजिटल टीम

IPL 2022 : आयपीएलच्या बहूप्रतिक्षित 15 व्या हंगामाला अखेर मुंबईतून सुरूवात झाली. मोठ्या कालावधीनंतर आयपीएल स्टार्स आपल्या फॅन्सच्या सानिध्यात भारतात खेळणार आहेत. पहिलाच सामना चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि केकेआर यांच्यात रंगला. त्यानंतर सुपर संडे मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) ब्रेबॉर्न स्टेडियमवर खास करणार. दरम्यान, आयपीएलचा पहिलाच सामना झाल्यानंतर दिग्गज फलंदाज सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) आणि ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज मॅथ्यू हेडेन (Matthew Hayden) यांनी यंदाच्या आयपीएलमध्ये सेमी फायनल कोण गाठणार याची भविष्यवाणीच केली.

स्टार स्पोर्ट्स चॅनेलसाठी समालोचन करताना सुनिल गावसकर यांनी सांगितले की मुंबई इंडियन्स नक्कीच सेमी फायनलमध्ये दिसेल. याचबरोबर गेल्या काही हंगामात दिल्ली कॅपिटल्सने देखील दमदार कामगिरी केली आहे. त्यामुले ते देखील सेमी फायनल खेळू शकतील. सुनिल गावसकरांनी याचबरोबर केकेआर देखील सेमी फायनल खेळू शकते असा अंदाज वर्तवला आहे. हा संघ तगडा दिसत आहे. याचबरोबर गावसकरांनी चेन्नई देखील सेमीफायनलमध्ये दिसण्याची शक्यता वर्तवली.

गावसकरांनी दोन स्टार संघ सीएसके आणि एमआय यांना संभाव्य सेमी फायनलमध्ये स्थान दिले. मात्र मॅथ्यू हेडेनने वेगळे मत मांडले त्याने सेमी फायनलमध्ये पोहचणाऱ्या संघात चेन्नई सुपर किंग्जला पहिली पसंती दिली. मात्र संभाव्य सेमी फायनलिस्टमधून मुंबई इंडियन्सला डच्चू दिला आहे. हेडेनने सेमी फायनलमध्ये केकेआर आणि आरसीबीला स्थान दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump Special Envoy Sergio Gor: ट्रम्प यांचे विशेष दूत सर्जियो गोर यांचं मोठं विधान म्हणाले, ''भारत आमचा धोरणात्मक भागीदार अन्... ''

IND vs WI Test Series: केएल राहुलकडे कसोटी संघाचे नेतृत्व, श्रेयस अय्यरचे पुनरागमन; वेस्ट इंडिजविरुद्ध अशी असेल टीम इंडिया

Modem Balakrishna : कोण होता मॉडेम बालकृष्ण? तब्बल एक कोटींचा होता इनाम, खात्मा झाल्याने नक्षलवाद्यांना मोठा झटका

Pune News : तीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या सावत्र बापाला मरेपर्यंत जन्मठेप

Nepal Protests : नेपाळमधील आंदोलनानंतर विमानसेवा सुरू, पर्यटकांचा मायदेशी परतीचा प्रवास

SCROLL FOR NEXT