Virat Kohli Sunil Gavaskar T20I  sakal
IPL

Virat Kohli Sunil Gavaskar : जर मी निवडसमितीत असतो तर... गावसकरांचे विराटच्या टी 20 भविष्याबाबत मोठे वक्तव्य

अनिरुद्ध संकपाळ

Virat Kohli Sunil Gavaskar T20I : आयपीएलचा 16 वा हंगामातील अवघा एक सामना शिल्लक आहे. यंदाच्या हंगामात विराट कोहली, शुभमन गिलची शतके, धोनीचे फेअरवेल अन् रिंकू सिंह, तिलक वर्मा यासारख्या अनेक गोष्टींची चर्चा झाली. मात्र या हंगामात अजून एक चर्चा जोर धरू लागली आहे. टी 20 क्रिकेट बदलत आहे अन् या नव्या टी 20 क्रिकेटमध्ये विराट कोहली सारख्या अँकर इनिंग खेळणाऱ्या फलंदाजाला स्थान आहे की नाही याबाबत अनेक जणांनी मतं व्यक्त केली आहेत.

दरम्यान, सुनिल गावसकर यांनी देखील या चर्चेत उडी घेतली आहे. सुनिल गावसकर यांच्या मते विराट कोहलीच्या टी 20 मधील भविष्याबाबत आताच चर्चा करणे घाईचे होईल. विशेष करून टी 20 वर्ल्डकपला अजून एक वर्ष अवधी आहे. विराट कोहलीने आयपीएलच्या 16 व्या हंगामात धडाकेबाज फलंदाजी केली आहे. त्याने पाठोपाठ शतकी खेळी केली. त्याने 14 सामन्यात 639 धावा केल्या आहेत. त्याने 53.25 च्या सरासरीने धावा केल्या. त्याचे स्ट्राईक रेट हे 139 इतके आहे. त्याने हंगामात 6 अर्धशतकी खेळी केल्या आहेत.

सुनिल गावसकर स्पोर्ट्स तकशी बोलताना म्हणाले की, 'पुढचा टी 20 वर्ल्डकप हा 2024 मध्ये खेळला जाणार आहे. या वर्ल्डकपपूर्वी मार्च - एप्रिलमध्ये अजून एक आयपीएल हंगाम होईल. विराट कोहलीचा त्यावेळेचा फॉर्म देखील विचारात घेतला जाईल. त्यामुळे याबाबत आता चर्चा करण्यात काही अर्थ नाही. जर आपण पुढच्या आंतरराष्ट्रीय टी 20 मालिकेबद्दल बोलत असू तर भारत पुढचा टी 20 सामना जून महिन्यात खेळणार आहेत. सध्याचा त्याचा फॉर्म पाहता विराट नक्कीच भारतीय टी 20 संघात बसतोय.'

गावसकर पुढे म्हणाले की, 'जर 2024 च्या वर्ल्डकपबाबत बोलायचं झालं तर तो वेस्ट इंडीज आणि अमेरिकेत होणार आहे. त्यामुळे खेळाडूंचा त्यावेळचा फॉर्म आयपीएलमध्ये चाचपला जाईल. त्यानंतर आपण वर्ल्डकपसाठीच्या भारतीय संघाबाबत चर्चा करू शकतो.'

'सध्या फॉर्ममध्ये असलेला विराट हा माझ्या टी 20 संघात नक्कीच बसतो. त्याने आयपीएल 2023 मध्ये दोन शतके ठोकली आहेत. इथं अर्धशतक ठोकणंही अवघड असते. या महान फलंदाजाने दोन शतके ठोकली. जर मी निवडसमितीत असतो आणि भारत जूनमध्ये टी 20 खेळणार असेल तर मी नक्कीच त्याला आपल्या संघात घेईन.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

"आमचं लग्न लोकांना मान्य नव्हतं" श्रुती मराठे- गौरव घाटणेकरचा धक्कादायक खुलासा; "तिची साथ नसती तर.."

Latest Maharashtra News Updates : मरकटवाडीच्या ग्रामस्थांचं विधानभवन बाहेर आंदोलन

Nargis Fakhri : 'तो मृतदेहावरचं मांस खायचा आणि मलाही..' अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव, म्हणाली, 'खणलेले मृतदेह काढून तो...'

SCROLL FOR NEXT