Sunil Gavaskar on Virat Kohli News Marathi sakal
IPL

IPL 2024 : सिंगल, सिंगल अन् फक्त सिंगल… विराट कोहलीचा स्ट्राईक रेट पाहून संतापले गावसकर

विराट कोहलीने या सामन्यात अर्धशतक झळकावले पण त्याच्या स्ट्राईक रेटमुळे त्याला टीकेला सामोरे जावे लागत आहे.

Kiran Mahanavar

Sunil Gavaskar on Virat Kohli : सलग सामने हारणाऱ्या आरसीबीला अखेर गुरुवारी विजयाची चव चाखायला मिळाली. संघाने सनरायझर्स हैदराबादचा पराभव करून हंगामातील आपला दुसरा विजय संपादन केला. विराट कोहलीने या सामन्यात अर्धशतक झळकावले पण त्याच्या स्ट्राईक रेटमुळे त्याला टीकेला सामोरे जावे लागत आहे.

विराट कोहलीने हैदराबादविरुद्ध 43 चेंडूत 51 धावा केल्या आहेत. या खेळीत त्याने चार चौकार आणि एक षटकार लगावला. आणि 118.60 च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी केली. संघाचे दुसरे अर्धशतक रजत पाटीदारच्या बॅटमधून झळकले. त्याने 20 चेंडूत 50 धावा केल्या होत्या. तो 250 च्या स्ट्राईक रेटने खेळला.

सुनील गावसकर सामन्यादरम्यान समालोचन करताना म्हणाले, 'फक्त एकेरी, एकेरी आणि एकेरी. कोहलीनंतर दिनेश कार्तिक आणि महिपाल लोमरोर हे खेळाडू मैदानात येणार आहे. त्यामुळे आता त्याला रिस्क घ्यावी लागेल. पाटीदार बघा, त्याने एकाच षटकात तीन षटकार मारले आहेत. त्याला हवे असते तर तो सिंगल घेऊ शकला असता किंवा चेंडू वाईड जाऊ देऊ शकला असता पण त्याने तसे केले नाही. जिथे जिथे संधी मिळाली त्याचा फायदा घेतला.

तो पुढे म्हणाला, ‘आरसीबीला याची गरज आहे. कोहली खेळला पण संधी गमावली. कोहलीला आता त्याच्या शेलमधून बाहेर यावे लागेल. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल. तरच काहीतरी घडेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raigad : समुद्रात बोट बुडाली! बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, थरारक व्हिडीओ व्हायरल, अनेकजण बुडाले

Maharashtra Latest News Update: हिंजवडी परिसरातील आयटी कंपनीतील 82 कोटी रुपयांच्या डेटाची चोरी

Beed : सरकारी वकिलानं कोर्टातच संपवलं आयुष्य, सत्काराच्या शालने घेतला गळफास; बीडमध्ये खळबळ

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात १४ विधेयकं मांडली, १२ मंजूर; चर्चेच्या वेळेत अन् प्रश्नोत्तरात कामकाज नापास

'हा' प्रसिद्ध राजकीय नेता अभिनेत्रीला करायचा अश्लिल मॅसेज, म्हणायचा..'हॉटेलवर चल' अभिनेत्रीने केला धक्कादायक अनुभव शेअर

SCROLL FOR NEXT