Sunil Gavaskar Autograph MS Dhoni 
IPL

MS Dhoni-Sunil Gavaskar : नवलचं झालं! दिग्गज सुनिल गावसकरांनी आपल्या छातीवर घेतली धोनीची साईन

Kiran Mahanavar

Sunil Gavaskar Autograph MS Dhoni : भारतीय क्रिकेटमधील महान फलंदाजांपैकी एक असलेले सुनील गावसकर यांनी रविवारी देशातील सर्वात यशस्वी क्रिकेट कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा ऑटोग्राफ घेतला. कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाजांसमोर 10,000 हून अधिक धावा करणाऱ्या गावसकरने कोलकाता नाइट रायडर्स (KKR) आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK) यांच्यातील सामन्यानंतर छातीवर धोनीचा ऑटोग्राफ घेतला. चालू मोसमातील चेपॉक मैदानावर चेन्नई सुपर किंग्जचा हा शेवटचा सामना होता.

सामना संपल्यानंतर 41 वर्षीय धोनी टेनिस रॅकेट घेऊन मैदानावर आला आणि त्याने टेनिस बॉलचा ऑटोग्राफ घेतला आणि रॅकेटच्या मदतीने तिथे उपस्थित प्रेक्षकांना चेंडू द्यायला सुरुवात केली. धोनीसह चेन्नई सुपर किंग्जचे इतर खेळाडू देखील प्रेक्षकांना चेंडू आणि टी-शर्ट देत मैदानाभोवती फिरत होते तेव्हा गावसकर पाठीमागून त्यांच्याकडे धावत आला आणि त्यानंतर धोनीने त्याच्या शर्टवर सही घेतली.

चालू मोसमात धोनीने चेन्नईचा कर्णधार म्हणून 200 वा सामना खेळला तेव्हा गावसकर यांनी त्याला आयपीएल इतिहासातील सर्वोत्तम कर्णधार म्हणून संबोधले. या वर्षी 17 एप्रिल रोजी गावसकर म्हणाले होते की, “चेन्नई सुपर किंग्ज संघाला कठीण परिस्थितीतून कसे बाहेर पडायचे हे माहित आहे आणि हे केवळ धोनीच्या नेतृत्वाखालीच शक्य झाले आहे.

कोणत्याही एका फ्रँचायझीसाठी 200 सामन्यांचे नेतृत्व करणे खूप कठीण असते, कर्णधारपद हे ओझ्यासारखे असते ज्यामुळे खेळाडूच्या कामगिरीवर परिणाम होतो पण माही वेगळा आहे, त्याच्यासारखा कर्णधार आजवर झाला नाही आणि भविष्यातही त्याच्यासारखा कोणी होणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा,प्रकरण काय?

India Selection Committee: रोहित शर्माचा जवळचा मित्र घेणार अजित आगरकरची जागा? गुवाहाटीतील मिटिंगमधील अनुपस्थितीने चर्चेला उधाण

मुलाचं Instagram अकाउंट पालकांना थेट पाहता येतं का? Metaचे नियम काय?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावा लागणार का?

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

SCROLL FOR NEXT